हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकतीच राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीला निरोप दिल्यानंतर त्यांनी आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी ७ जुलै २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.
मुख्य म्हणजे, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सर्व पदाधिकारी मंडळींच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचे आपल्या पक्षात स्वागत केले. आज शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षीय कार्यकारणी बैठक झाली. यावेळी अनेक नवीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्यामध्ये अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचाही समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रिया बेर्डे यांनी भाजपमधील प्रवेश स्वीकारला.
माहितीनुसार, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी ७ जुलै २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता हे बंधन तुटलं असून प्रिया बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे या मराठीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री असून दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आहेत. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांना स्वानंदी आणि अभिनय हि दोन मुले आहेत. प्रिया बेर्डे सध्या त्यांची लेक स्वानंदी हिच्यासोबत ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकात अभिनय करत आहेत.
Discussion about this post