हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींनीही आंदोलनावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली असून आपलं मत व्यक्त केलं आहे.
प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे”. प्रियांका चोप्राचं हे ट्विट दिलजीतने रिट्विट केलं आहे.
यापूर्वी रितेश देशमुखने दर्शवला पाठिंबा –
यापूर्वी रितेश देशमुखने ट्वीट करत म्हटलं की, ‘जर तुम्ही आज जेवत असाल तर त्याबद्दल शेतकर्याचे आभार माना. मी आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यांसोबत एकजुटने उभा आहे.’ दरम्यान, बॉलिवूड आणि पंजाब सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’