हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ सिने इंडस्ट्रीतील तयां लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू सोशल मी इंडियावर नेहमीच चर्चेत असते. साधी राहणी, ग्लॅमर्स लूक, स्टाईल, स्माईल अशा विविध गोष्टींमुळे समंथावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची संख्या रोज वाढत असते. समंथा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. दरम्यान तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये समंथाचा हॉस्पिटलमधील एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते काळजी करताना दिसत आहेत.
अलीकडेच काही दिवसांपूर्वी समंथाचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. एका निर्मात्याने तर समंथाने तिचे स्टारडम गमावले आहे असा टोलादेखील लगावला. दरम्यान, समंथाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या गेल्या दिवसांची एक झलक दाखवणारे काही फोटो तिने शेअर केले आहेत. हे फोटो तिने अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘जसा माझा दृष्टिकोन आहे…’. यामध्ये तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून, प्रवास करतानाचे आणि काम करतानाचे असे विविध श्रेणीतील फोटो शेअर केले आहेत. यातील तिचा हॉस्पिटलमधील फोटो पाहून चाहते मात्र अस्वस्थ झाले आहेत.
समंथाच्या या फोटोने चाहत्यांना चिंतेत पाडले आहे. साहजिक आहे आपल्या लाडक्या अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून कुणीही चिंता व्यक्त करेल. समंथाने काही काळापूर्वी ती एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले होते. मायोसिटिस नावाच्या आरोग्य समस्येने आपण ग्रस्त असल्याचे तिने सांगितल्यापासून तिच्या प्रकृतीविषयी चाहते नेहमीच चिंता व्यक्त करताना दिसतात. अशातच तिचा हॉस्पिटलमधला फोटो पाहून तिला पुन्हा काय झाले..? या विचाराने चाहते व्याकुळ झाले आहेत. तर यात घाबरण्यासारखे काही नसून समंथाचा हा फोटो थेरपी दरम्यानचा आहे. ऑटोइम्यूनसाठी ‘हायपरबेरिक थेरपी’ सुरु असताना हा फोटो काढण्यात आला होता.
Discussion about this post