Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता बस..मी त्याच्यासोबत राहू शकत नाही; कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी अभिनेत्रीने ठोठावले न्यायालयाचे दार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 5, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Arzoo Govitrikarr
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘नागीन 2’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरच्या कौटुंबिक आयुष्यात सध्या अनेक वादळं येऊन स्थिरावली आहेत. यामुळे जगणे जणू एक युद्ध असल्याचे तिला भासू लागले आहे. सध्या आरजूने तिचा पती सिद्धार्थ सभरवालवर याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आरजूने २०१९ मध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता तिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावत घटस्फोटाची मागणी केली आहे. आरजू ही बॉलिवूड जगतातील एकेकाळची प्रचंड गाजलेली अभिनेत्री अदिती गोवित्रीकरची बहीण आहे.

https://www.instagram.com/p/BlpaI2glMZP/?utm_source=ig_web_copy_link

ई-टाईम्सशी संवाद साधत आरजूने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे. हि आपबीती सांगताना ती म्हणाली, सिद्धार्थच्या दारूच्या व्यसनावरून आमचं भांडण झालं होतं. या भांडणादरम्यान त्याने मला जबर मारहाण केली होती. मला बाथरूमपर्यंत ओढत नेत मला मारहाण केली होती. त्यानं माझ्या पोटात लाथ घातली. मला बेल्टनं झोडपून काढलं. शिवाय मला घराबाहेरही काढलं. माझ्या शरीरावर काळे निळे डाग पडले होते. माझ्या जखमा लोकांना दिसू नयेत, म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते. तो मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करायचा. मी घरात काम करणारी मोलकरीण आहे, असं सांगायचा. इतकं सहन करूनही मी तेव्हा गप्प राहिले.

https://www.instagram.com/p/BkxKb7PlO-b/?utm_source=ig_web_copy_link

पुढे म्हणाली, माझा स्वाभिमान बाजूला ठेवून मी त्याच्यासोबत राहिले. पण आता बस. आता मी शांत राहू शकत नाही. गेली २ वर्षे मी सर्व छळ सहन केला. आता मात्र मी थकलेय. आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आमच्या लग्नाला केवळ २ वर्ष झाली होती, तेव्हा त्याने माझ्यावर पहिल्यांदा हात उचलला होता. त्यानंतर आम्हाला मुलगा झाल्यावर तो वेगळ्या खोलीत झोपू लागला. पुढे, मला कळलं की त्याची एक रशियन गर्लफ्रेंण्ड आहे. तिच्याशी तो सतत चॅट करायचा. आता ते एकत्र आहेत की नाही मला ठाऊक नाही. कारण ते वेगळे राहायचे, असेही तिने म्हटले आहे.

Tags: Aarzoo GovitrikarrDivorce Case FiledFamily DisputeNagin 2 FameOver Domestic Violencetv actress
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group