Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आरारा खतरनाक!! प्रवीण तरडेंच्या पत्नीची स्काय डायविंग करताना 15 हजार फुटांवरून उडी; पहा थरारक व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 9, 2023
in Trending, Hot News, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Snehal Tarde
0
SHARES
61
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा रांगडा अंदाज त्यांना नेहमीच चर्चेत आणत असतो. पण यावेळी प्रवीण तरडे त्यांच्या पत्नीमुळे चर्चेत आले आहेत. त्याच काय आहे अभिनेता प्रवीण तरडे हे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेसोबत ऑस्ट्रेलियाच्या टूरवर आहेत. अलीकडेच हे जोडपं ऑस्ट्रेलियातील एका उद्योजकाची भेट घेताना दिसले. यानंतर काल जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना स्नेहल तरडे यांनी एक अनोखा उपक्रम करून दाखवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

बुधवारी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटी कलाकार आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समस्त महिला वर्गाला शुभेच्छा देताना, सलाम ठोकताना दिसला. पण नुसतीच पोस्ट काय शेअर करायची.. आज कुछ तुफानी करते है म्हणत अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये स्काय डायव्हिंगचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी तब्बल १५ हजार फुटांवरून उडी मारण्याचा उपक्रम करीत एक धाडसी पाऊल उचलले आहे. त्यामुळे जागतिक महिला दिन साजरा करण्याची स्नेहल यांची पद्धत सर्वांनाच फार आवडली आहे. स्नेहल यांचा स्काय डायविंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

जागतिक महिला दिनानिमित्त काहीतरी वेगळे करायचे म्हणून स्नेहल तरडे यांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत हा उपक्रम केला आहे. यावेळी स्नेहल यांच्यासह अनिता पाटील आणि रूपाली पवार या त्यांच्या मैत्रिणींनीसुद्धा स्काय डायव्हिंगचा आनंद लुटला आहे. स्नेहल यांनी स्काय डायविंगला जाताना म्हटले कि, ‘आम्ही आई जिजाऊच्या लेकी आहोत, १५ हजार फुटावरून काय, ३० हजार फुटावरूनही उडी मारू शकतो.. मी उडी मारणार.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र!’ स्नेहल यांनी कोणतीही भीती न बाळगता स्काय डायविंगचा थरार अनुभवला. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tags: Instagram PostMarathi Actresspravin tardeSnehal TardeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group