Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री स्वरा भास्करच्या जीवाला धोका; अज्ञात व्यक्तीकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 30, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Swara Bhaskar
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे पिता सलीम खान याना एका अज्ञात व्यक्तीकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या पत्रामुळे सर्वत्र खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर पोलीस यंत्रणाही सतर्क झाली होती. अजूनही या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मात्र असे असूनही आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे सलमाननंतर आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. माहितीनुसार तिच्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

देश के नौजवान तो ख़ैर सड़कों पर नौकरी की माँग कर रहे हैं..
पर एक प्रजाति महंगाई, बेरोज़गारी, भुखमरी सब सहेगी.. बस ऐतिहासिक सच और तथ्य नहीं सहेगी!
इतना रोश पर नम्बर रेवारी में बैठे किसी चाचा का डाला है भाई ने! 😬💁🏽‍♀️ pic.twitter.com/wtuYE3HoD7

— Swara Bhasker (@ReallySwara) June 29, 2022

हे पत्र हिंदी भाषिक असून स्वराला तिच्या घरच्या पत्त्यावर आले आहे.  अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर या पत्राचे फोटो शेअर करत लिहिलंय कि, देशातील तरुण रस्त्यावर उतरून नोकरीची मागणी करत आहेत. पण एका जातीला महागाई, बेरोजगारी, उपासमार सहन करावी लागेल.. नुसते ऐतिहासिक सत्य आणि तथ्ये टिकणार नाहीत! एवढा राग – पण नंबर रेवाडीत बसलेल्या एका काकांनी टाकलाय, भाऊ. हे पत्र मिळाल्यानंतर स्वराने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंदवली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

 

अभिनेत्री स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिस सतर्क झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे पत्र मिळाल्यानंतर स्वराने २ दिवसांपूर्वी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. या पत्रात लिहिलेला मजकूर आक्रमक आहे. ‘वीर सावरकरांचा अपमान करणे थांबवा आणि फक्त स्वतःच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करा, असा आक्रमक इशारा या पात्रातून अभिनेत्रीला देण्यात आलाय. केवळ या पत्रात पाठवणाऱ्याचे नाव लिहिलेले नाही. तर त्याजागी स्वत:ला आपण भारताचे नागरिक असल्याचे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

Tags: Bollywood ActressDeath ThreatsInstagram PostSwara BhaskarTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group