हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान आंदोलन करणारे शेतकरी पिझ्झा खात असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून काही नेटकरी संतापले अन् त्यांनी आंदोलनकर्त्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या टीकाकारांना आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जे शेतकरी गहूची शेती करतात ते गहूपासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाही का? असा सवाल तिने विरोधकांना केला आहे.
जे शेतकरी गहूची शेती करतात ते गहूपासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाही का? त्यांचे पाय मेहनतीचे प्रतिक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच देशातील जमीन सुपीक बनते. यांना देखील पायांचा मसाज करण्याचा अधिकार आहे. कोण आहेत ते ज्यांना शेतकऱ्यांना कायम दरिद्री आणि लाचार परिस्थितीतच पाहायचं आहे?” अस ट्विट करुन स्वराने ट्रोलर्सला रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान देशातील शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांचं सिंघु बॉर्डरवर एक दिवसीय उपोषण आहे. या उपोषणासाठी दिल्ली बॉर्डरजवळ आणखी 10 हजार शेतकरी पोहोचले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आंदोलनाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील बसणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’