हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे; हि मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत स्वराज आणि मल्हारचं नातं आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. स्वराज स्वरा आहे हे सत्य जरी मल्हारला समजलं नसलं तरीही स्वराचा मात्र बाबांचा शोध थांबला आहे. स्वराला मल्हार गुरुजीचं तिचे बाबा असल्याचे समजले आहे. मात्र या दरम्यान तिचा आवाज गेल्याने ती हे बोलू शकत नाहीये. तर दुसरीकडे उर्मिला कानेटकर- कोठारे या मालिकेत पुन्हा एंट्री करते आहे. तिने मालिकेत स्वराची आई वैदेहीची भूमिका साकारली होती. पण आता वैदेही नाही तर मंजुळा सातारकर येतेय.
आतापर्यंत सोज्वळ, सालस अशा सौम्य भूमिकेत आपण उर्मिलाला पहिले असेल पण आता मात्र ती एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून आपल्या भेटीला येते आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत उर्मिला पुन्हा एंट्री करताना स्वराची आई वैदेही म्हणून नाही तर मंजुळा सातारकर नावाची एक वेगळीच व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. एकीकडे स्वराला तिचं मल्हारसोबत असलेलं बाप- लेकीचं नातं सांगायची इच्छा आहे. मात्र नियतीच्या खेळात तिच्या आयुष्यातील या क्षणालाही गालबोट लागलं आहे. जेव्हा मल्हारला बाबा हाक मारण्याचा क्षण स्वराच्या आयुष्यात आला तेव्हाच स्वराने अपघातात तिचा आवाज गमावला. आता स्वराच्या मनातली भावना ती कशी व्यक्त करणार..? हे पुढील भागांत कळेल.
स्वराची आई वैदेहीचं आजारपणाने निधन झाल्याचे दाखवले असले तरीही स्वराच्या आठवणीत तिची आई अनेकदा दाखवली आहे. यानंतर आता मंजुळा सातारकर आल्यानंतर मालिका काय वळण घेणार..? हे पाहणे उत्सुकतेचे राहील. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील उर्मिलाच्या या नव्या भूमिकेचा नवा अंदाज काही औरच असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही तिला या भूमिकेत पहायला उत्सुक आहेत. कारण उर्मिलाने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा हि भूमिका अतिशय वेगळी आणि हटके आहे, असे तिने स्वतःच म्हटले आहे.
Discussion about this post