हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉईज थ्रीमध्ये कल्ला करत अभिनेत्री विदुला चौगुलेने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. कमी वयात विदुलाने मालिका आणि चित्रपट यांसारख्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःसाठी एक हक्काची जागा निर्माण केली आहे. यामुळे विदुलाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यात विदुला सोशल मीडियावर फार सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती अनेकदा विविध फोटो शेअर करताना दिसते. असेच एक नवेकोरे समर फोटोशूट शेअर करत तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री विदुला चौघुलेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे नवं फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने फिकट लाल रंगाची फ्लोरल डिझाईन असलेली साडी परिधान केली आहे. सोबतच स्लिव्हलेस ब्लाऊज, लाईट मेकअप, साजेशी हेअर स्टाईल करत तिने लक्ष वेधून घेतलं आहे. या साडीमध्ये विदुला कमालीची सुंदर आणि देखणी दिसत आहे. तिचं हे नवं फोटोशूट उन्हाळा स्पेशल असल तरीही मनाला मात्र थंडावा देत आहे. विदुलाची गोड स्माईल नेटकऱ्यांच्या काळजावर हल्ला करतेय.
 
  
 
विदुलाच्या या फोटोशूटवर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने तर मजेशीर अंदाजात म्हटले आहे की, ‘ एव्हढ्या उन्हात आमची त्वचा तर करपली… पण तुझी उजळली आहे’. याशिवाय काही नेटकरी तिच्या सौंदर्याची तारीफ करताना ‘सौंदर्यवती’, ‘कातिल’, ‘क्रश’, ‘संतूर गर्ल’ अशा शब्दांचा प्रयोग करत आहेत. अभिनेत्री विदुला चौघुलेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने स्वतःच्या अभिनय विश्वातील कारकीर्द कलर्स मराठी वाहिनीच्या ‘जीव झाला येडा पिसा’ या कार्यक्रमातून केली. यानंतर तिने ‘बॉईज ३’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post