aहॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील अत्यंत गाजलेले आणि मुरलेले घराणे म्हणजे शिंदे घराणे. या घराचा संगीताचा वारसा पुढील पिढ्या देखील तितक्याच जोमानं आणि उत्साहाने चालवत आहेत. प्रल्हाद शिंदे यांची भक्तिगीते असो किंवा आनंद शिंदे यांच्या उडत्या चालीची गाणी.. यापुढे आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी विविध ढंगातील गाणी रसिकांच्या भेटीस आणली. हि गाणी तुफान गाजली आणि शिंदे घराण्याचं नाव संगीत विश्वात असंच घट्ट पाय रोवत राहीलं. नुकतंच शिंदेंच्या या पिढीनं आणखी एक गाणं रसिकांसाठी आणलं आहे. जे चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि गायक, इंटरटेनर, ऍक्टर, डॉक्टर अशी विविध क्षेत्रात मजल मारलेला उत्कर्ष शिंदे यांनी मिळून रचलेले ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ हे गाणे रसिकांच्या भेटीस आले आहे. विजयानंद म्युझिक नावाच्या युट्युब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल असे आहेत कि, ‘तुमचं आमचं नातं काय..? जय जिजाऊ, जय शिवराय’. या गाण्याचे बोल आदर्श आणि उत्कर्ष यांनी मिळून लिहिले आहेत. तर आदर्शने हे गाणे गायले आहे. तसेच संकल्पना उत्कर्ष शिंदे याची आहे.
हे गाणे बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाले असून अगदी काही तासांतच या गाण्याला ९ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात उत्कर्ष शिंदे मध्यवर्ती दिसत आहेत. लांब केस, कापली चंद्रकोर आणि हातात भगवा घेऊन उत्कर्ष या गाण्यावर थिरकतो आहे. या गाण्याला रसिकांनी आपली पसंती देत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि, ‘जय जिजाऊ जय शिवराय.. एकच नंबर गान..दादा शिंदे शाहिचा जगात कुठेच तोड नाही..’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘आदर्श दादा चा आवाज ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो’. आणखी एकाने लिहिलंय, ‘शिंदेशाही ही आपल्या महाराष्ट्राला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे . असेच ” उमदा” कलाकार या मराठी मातीत जन्माला आलेत… येवोत…हीच आई जगदंबा चरनी प्रार्थना……बाकी… जय शिवराय’
Discussion about this post