हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आम्ही शिवाचे सैनिक वेडे.. करू जीवाचे रान..’ एव्हढेच शब्द कानावर पडले तरीही तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती गुणगुणू लागतो. ते म्हणजे शिवसेनेचे धगधगते गीत ‘जात, गोत्र अन् धर्म आमुचा.. शिवसेना.. शिवसेना.. शिवसेना’. या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरांच्या मैफिलीत गुंफलेले हे गाणे शिव सैनिकांसाठी जापमंत्र आहे. पण गेल्या काही काळापासून सुरु राजकारणाने असे काही वेग घेतले कि शिवसेना दुभंगली. यामध्ये वेगळ्या झालेल्या शिवसैनिकांनी आपली अशी शिवसेना निर्माण केली. यानंतर आता हि नवी सेना नवे स्फूर्तिगीत घेऊन येतेय. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा भगवं वादळ आहे कि वादाचं वावटळ आहे असा एक अनुत्तरित प्रश्न निर्माण झालाय.
शिवसेनेची बुलंद तोफ मा. गुलाबराब पाटील यांची संकल्पना असलेली हि नवीकोरी कलाकृती प्रेक्षकांच्या आणि तमाम शिवसैनिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. याची निर्मिती ‘प्रभारंग फिल्म्स्’ यांनी केली असून हे गाणे एक विशेष आकर्षक ठरणार आहे. कारण या स्फूर्तिगीताला मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आवाज लाभला आहे. गायक आदर्श शिंदेच्या भक्कम सूरात या गाण्याची बांधली केली आहे. तर गाण्याचे निर्माते संदिप माने, कार्यकारी निर्मात्या उर्मिला हिरवे आहेत. तसेच गीतकार संतोष सातपुते आहेत. तर संगीतकार पार्थ उमराणी आहेत. शिवाय सत्यजित पाटील, शरद डहाळे, प्रतीक शिंदे, विशाल पाटील, अमोल घोगरे या टीमने एडिटिंगची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे हे नवे स्फूर्तिगीत म्हणजे एक अद्वितीय कलाकृती ठरणार आहे. दसऱ्याच्या दिवशी म्हणजे उद्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दशहरा मेळाव्यादरम्यान या गाण्याचा लाँच इव्हेंट मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या लॉन्च इव्हेन्टचे थेट प्रक्षेपण उद्या दुपारी १.३० वाजता सर्व प्रमुख न्यूज चॅनेल्स वर केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच हे स्फूर्तिगीत म्हणजे, हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांना एका शिवसैनिकाने दिलेली अनोखी मानवंदना आहे, असेही म्हटले जात आहे.
Discussion about this post