हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम या शब्दाची आणि या भावनेची काही वेगळीच नशा असते. म्हणायला नुसताच शब्द पण अनुभवला तर आयुष्यातील सगळ्यात सुंदर आणि महत्वाचा क्षण म्हणजे प्रेम. आजकाल अनेक प्रेमी युगल आपण पाहतो. काही दिवस, काही महिने, काही वर्ष तर काही तासांतच अनेक युगल वेगळी होताना आपण पाहिली असतील. पण श्वासात श्वास असेपर्यंत झुरणाऱ्या व्यक्तीलाच माहित असतं कि प्रेम म्हणजे काय असतं. तुम्ही केलंय का कधी प्रेम..? कधी विरह, दुःख आणि आठवणीत रामलायत का? जर हो.. तर ऑटोग्राफ चित्रपटातील हे गाणे नक्कीच तुम्हाला आवडेल.
मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यात काही दिवसांपूर्वी दुरावा असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच उर्मिलाने नुकतीचं एक पोस्ट शेअर केली आहे चर्चेत आली आहे. उर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘ब्रेकअप झालंय..? अबोला धरलाय..? आठवण येतेय खूप..? त्रास होतोय ना..! कानात हेडफोन्स घाला आणि फक्त फिल करा…’ हि पोस्ट शेअर करण्यामागे तिचा मुख्य हेतू आहे तिच्या आगामी चित्रपटातील ‘अधुरे अधुरे’ हे भावनिक गाणं. हे गाणं नुकतंच रिलीज झालं असून तिने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे.
‘ऑटोग्राफ’ या चित्रपटातील अधुरे-अधुरे हे गाणे तुम्ही कळत नकळत अनुभवलेल्या भावनांविषयी व्यक्त होत आहे. अतिशय सुंदर, सौम्य आणि अर्थपूर्ण शब्दांनी बांधलेलं हे गाणं कानांना मधुर आणि मनाला भावणारं आहे. ‘ऑटोग्राफ – जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी’ हा चित्रपट पहिल्या मोशन पोस्टरपासून चर्चेत आहे. हा चित्रपट सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे, मानसी मोघे यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Discussion about this post