हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून बॉलिवूड सिनेसृष्टीवर बॉयकॉटचे संकट वारंवार घोंगावताना दिसले आहे. त्यामुळे बॉलिवूडमधून उत्तम आणि दर्जेदार कलाकृतींची घडण होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अशातच आता गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘फराज’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये दहशतवाद्यांचं भीषण सत्य जगासमोर येणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर आणि बॉलिवूडचे बाबू भैय्या अर्थात परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल अभिनय सृष्टीत पदार्पण करत आहेत.
‘फराज’ या सिनेमाचा ट्रेलर साधारण २ मिनिट ६ सेकंद इतका आहे. या सिनेमाच्या कथानकामध्ये, तरुण दहशतवाद्यांचा एक समूह आहे जो एका महागड्या कॅफेमध्ये नरसंहार घडवताना दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. तर अनुभव सिन्हा यांनी निर्मिती केली आहे. ‘फराज’ हा आगामी सिनेमा ३ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या क चित्रपटाची कथा ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची कथा आहे. इथे दहशतवाद्यांनी एका कॅफेवर हल्ला करून अनेक निष्पाप लोकांना क्रूरपणे ठार मारले होते.
या चित्रपटात परेश रावल यांचा मुलगा आदित्य मुख्य दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसतो आहे. या चित्रपटात फराजची भूमिका जहान कपूर साकारतोय. जो एका अशा तरुणाच्या भूमिकेत आहे जो जीव वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी वाद घालतो आणि त्यांना चांगलंच सुनावतो. या सिनेमाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले असून भूषण कुमार, अनुभव सिन्हा, साक्षी भट्ट, साहिल सहगल आणि मजहिर मंदसौरवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. जहान कपूर आणि आदित्य रावल यांच्याशिवाय या चित्रपटात जुही बब्बर, आमिर अली, सचिन लालवानी, पलक लालवानी आणि रेशम सहानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Discussion about this post