हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचे सर्व चित्रपट हे नेहमीच विविध कथांवर भाष्य करणारे असतात. विविध धाटणीच्या कथांचे उत्तमरीत्या सादरीकरण करणे हि आदित्य सरपोतदार यांची खासियत आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘उनाड’ झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. हि स्पर्धा चेक रिपब्लिक येथे होणार असून अशा प्रतिष्ठित महात्सवात ‘उनाड’ चित्रपटाचा सहभाग हि मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित ‘उनाड’ या चित्रपटात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘उनाड’ हा चित्रपट अत्यंत वेगळ्या कथेशी संबंधित आहे. ही कथा महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या हर्णे येथील ३ तरुण मुलांची गोष्ट आहे. या तीन मुलांची नाव शुभ्या, बंड्या आणि जमील अशी आहे. हे तिघेही चांगले मित्र आहेत जे आपला वेळ संपूर्ण गावात हुंदडण्यात घालवतात. त्यांच्या जीवनात कोणतेही विशिष्ट ध्येय नाही. गावातील लोक त्यांच्याकडे उनाड मुले म्हणून पाहत असत आणि म्हणून हि मुले एका अडचणीत सापडतात. त्यांच्या आयुष्याचा कायापालट करणारी हि घटना अत्यंत लक्षवेधी आहे. म्हणूनच या चित्रपटाची निवड झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. हा महोत्सव जगभरातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा महोत्सव मानला जातो. हा कार्यक्रम मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चित्रपट निर्मितीच्या नवीन संधी घेऊन येतो. गतवर्षी या महोत्सवाला जगातील ५२ देशांतील ३१० चित्रपटांचा समावेश होता. तर यंदाच्या संख्येत १ मराठी चित्रपट म्हणून ‘उनाड’ चित्रपट सामील झाला आहे
‘उनाड’ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले कि, “महत्त्वाच्या आणि संबंधित युवा वर्गात ‘उनाड’ ची निवड होणे ही चित्रपटासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही कोळी समाजातील सध्याच्या तरुणांचा वास्तववादी विचार करण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटात तीन तरुणांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या महोत्सवात ‘उनाड’ची निवड होणे ही आमच्या टीमच्या प्रवासाची पावती आहे. आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहात आहोत विशेषतः या महोत्सवाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांची.”
Discussion about this post