हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील बहारदार चित्रपट ‘जत्रा’ आजही टीव्हीवर लागला कि प्रेक्षक आवर्जून पाहतात. या चित्रपटाचे कथानक, कथेतील पात्र, कलाकारांचा अभिनय, गाणी सगळं काही तुफान गाजलं. चित्रपटातला मोन्या आणि त्याची पलटण, शिवाय कानोळे आणि ह्यालागाड- त्यालागाड.. बापरे बाप. नुसता कल्ला. या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. तर कोंबडी पळाली गाण्याने कित्येकांची हळद, लग्न वरात, पार्टी, गॅदरिंग गाजवले. आजही जत्रा जसाच्या तसा अगदी तोंडपाठ असणाऱ्यांची संख्या कमी नाही. हा चित्रपट ज्या गावात चित्रित झाला ते गावसुद्धा आज बदललंय. पण गावातली ‘जत्रा’ अजूनही जशीच्या तशी. या गावाचा एक व्हिडीओ केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होतोय.
लेखक ओमकार मंगेश दत्त यांनी हा व्हिडीओ बनवला आणि शेअर केला आहे. जो दिग्दर्शक केदार शिंदे यांनी रिपोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये ‘जत्रा’ चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या गावातील काही ठिकाणांचे फोटो टिपले आहेत. हे त्या त्या लोकेशनचे फोटो आहेत जे चित्रपटातील विविध सीनसाठी वापरले होते. आज या प्रत्येक लोकेशनमध्ये काही ना काही विविधता दिसून येत आहे. मात्र या गावात पाय टाकताच चित्रपटाच्या टीमला ‘जत्रा’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी केलेली धमाल मस्ती पुन्हा आठवली. आगामी मराठी चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’च्या निमित्ताने हि टीम या गावात पुन्हा एकदा गेली होती.
या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘२८ ऑक्टोबर २००५ साली जत्रा रिलीज झाला होता.. ह्या २८ ला १७ वर्ष झाली त्या दिवसाला.. एक तो दिवस आहे आणि एक आजचा.. ह्या वर्षांमध्ये जत्राने महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना अगणित वेळा हसवलं आहे.. त्याच्या गाण्यांनी कैक कार्यक्रम आणि डी जे पार्टीज रंगवल्या आहेत.. कित्येकांच्या आयुष्याचा भाग बनलेला जत्रा आमच्याही आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.. सध्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात गेलेलो असताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणांना भेट दिली जिथे जत्रा शूट झाला होता.. आणि कित्येक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. आता सगळं बदललं आहे पण अजून आपली जत्रा तशीच आहे!!!!’
Discussion about this post