हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या २ वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेऊन अनेक निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी राज्यातील सर्व चित्रपट गृहे टाळेबंद स्थितीत होते. यानंतर आता कुठे राज्यात दिलासाजनक स्थितीनंतर सर्व नियमांमध्ये शिथिलता आल्याने थिएटर खुली करण्यात आली आहेत. दरम्यान एका पाठोपाठ एक, एकापेक्षा एक चित्रपटांची मालिका सुरु झाली आहे. यात पांडू, झिम्मा, जयंती या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी इतका चांगला प्रतिसाद दिला आहे की थिएटर खुले झाल्यानंतर आता थिएटर बाहेर हाऊसफुल्लची पाटी पाहायला मिळतेय. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांमध्ये याचा अतिशय आनंद दिसून येत आहेत. दरम्यान साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरचे मालक अतुल खुटले यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
सातारा जिल्ह्यातील नामवंत चित्रपट गृह राजलक्ष्मी येथे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत संपूर्ण दिवसभरात एकूण ५ शो लावले जात आहेत. सध्या थिएटरमध्ये झिम्मा, पुष्पा, स्पायडरमॅन आणि पांडू हे चित्रपट प्रसिद्ध होत आहेत.
थिएटरचे शो टाइम दुपारी १२, त्यानंतर २.५०, पुढे संध्याकाळी ०५.०० आणि ७.३० तर रात्री नाईट शो १०.१५ आहेत. सध्या यांपैकी प्रत्येक चित्रपटाचा प्रत्येक शो हा टोटल हाउसफुल्ल असल्यामुळे थाटात कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या नियमांमधील शिथिलतेचा आनंद घेत सातारकर एकही विकेंड आनंद साजरा करण्याचा वाया घालवत नाही आणि म्हणूनच शुक्रवार – शनिवार – रविवार अश्या विकेंड शो साठी चित्रपटगृह हाऊसफुल्लची पती लावू शकत आहे.
हे प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि म्हणून इतका उदंड प्रतिसाद मिळत आहे अशा भावना राजलक्ष्मी थिएटरचे मालक अतुल खुंटळे यांनी व्यक्त केल्या आहेत. शिवाय सातारकरांनी त्यांच्या आवडत्या चित्रपटाचा आवर्जून आनंद घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.
Discussion about this post