हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आता ‘बिग बॉस मराठीचा अगदी शेवटचा टप्पा आला असून प्रेक्षकांचा आवडता शो निरोपाच्या वाटेकडे मार्गस्थ झाला आहे. एकीकडे प्रत्येक स्पर्धकाची जिंकायची जिद्द आणि दुसरीकडे अगदी शेवटपर्यंत येऊन बाद होण्याची भीती. गेल्या आठवड्यात घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि सोनाली पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. आठवडाभर या स्पर्धकांच्या डोक्यावर एव्हिक्शनची टांगती तलवार होती. यानंतर अखेर ‘चावडी’ रंगली आणि बिग बॉस मराठीच्या घरातून आणखी एका सदस्याने गेमच्या शेवटच्या टप्प्यात घराचा निरोप घेतला. हि स्पर्धक आहे सोनाली पाटील. होय यावेळी घरातील कोल्हापूरची मिरची म्हणून प्रसिद्ध झालेली सोनाली पाटील हि घरातून बाहेर पडली
बिग बॉस मराठीच्या घरात जवळपास ९० दिवस पाय रोवून प्रेक्षकांचे मनोरंजन करून अखेरच्या टप्प्यात सोनाली घराबाहेर झाली. घरातील प्रत्येक नॉमिनेशनवेळी सोनाली नॉमिनेट झाली आणि प्रेक्षकांच्या भरघोस मतांनी तिला नेहमीच एव्हिक्शनपासून वाचविले. मात्र यावेळी सोनाली घरातून बाद झाली आणि यामुळे मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील यांचा प्रवास फायनल विकपर्यंत शाबूत राहिला. शनिवारच्या चावडीत महेश मांजरेकर यांनी नॉमिनेट स्पर्धकांच्या बॅग्स बाहेर मागून जो वाचेल त्याची बॅग परत येईल असे सांगितले होते आणि रविवारी परतलेल्या बागेत सोनालीचे नाव नसल्यामुळे तिला गेमच्या शेवटच्या टप्प्यात हताश होत घराबाहेर पडावे लागले.
आता ‘बिग बॉस मराठीच्या स्पर्धेत उरलेयत फक्त ६ स्पर्धक. जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शाह आणि विशाल निकम. यांपैकी विशाल निकम याने टिकिट टू फिनाले मिळवल्यामुळे तो थेट फायनलिस्ट झाला आहे. मात्र उरलेल्या ५ जणांमध्ये स्पर्धा कायम आहे. शिवाय महेश मांजरेकर यांनी रविवारी सोनालीच्या एव्हिक्शननंतर घरात उरलेल्या ६ स्पर्धकांपैकी विशाल निकमला सोडून उरलेल्या ५ जणांना एक सूचना केली. हि सूचना अशी होती कि उरलेल्या आठवड्यात आणखी एक एव्हिक्शन होणार आहे. याचा अर्थ असा कि ‘बिग बॉस मराठीचे टॉप ५ फायनलिस्ट मिळवण्यासाठी आणखी एक स्पर्धक या आठवड्याच्या मध्यान्हात घराबाहेर होणार आहे. ‘बिग बॉस मराठीचा फिनाले सोहळा २६ डिसेंबर २०२१ रोजी होईल आणि आपल्याला ‘बिग बॉस मराठी ३ च्या विजेत्यांचा नाव मिळेल.
Discussion about this post