Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आई झाल्यानंतर गौहर खानने शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली, ‘आता माझ्यात शक्ती उरलेली नाही..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Gauhar Khan
0
SHARES
98
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने बुधवारी १० मे २०२३ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि आई म्हणून नव्या जीवनाला सुरुवात केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. या पोस्टनंतर सोशल मीडिया युजर्स आणि अनेक सेलिब्रिटी मंडळींनी गौहर आणि तिचा पती झैद दरबार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. इतकंच नव्हे तर या बाळाचे जगामध्ये शुभेच्छा अन आशीर्वादांसह स्वागत केले. दरम्यान गौहर खानने मातृदिनाच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली होती. जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. दरवर्षी कलाकार मंडळी या दिवसाचे औचित्य साधत आपल्या मुलांसोबत आणि आईसोबतचे फोटो शेअर करतात. यंदाही कलाकार मंडळी फोटो शेअर करत पोस्ट लिहिताना दिसले. यामध्ये गौहर खानचाही समावेश आहे. नुकतीच आई झालेली गौहर देखील मातृदिनानिमित्त व्यक्त झाली आहे. तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिचा नो मेकअप लूक शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

गौहर खानने आई झाल्यानंतरचा पहिला ‘मदर्स डे’ कसा साजरा केला..? याबाबत हि पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलंय कि, ‘आता रात्रीचे १२ वाजले आहेत आणि आई झाल्यानंतरचा माझा पहिल्याच मातृदिनाचा दिवस संपला आहे. आई झाल्यानंतर माझ्या पहिल्या मातृदिनासाठी खास तयार होऊन पोस्ट शेअर करावी असं वाटतं होतं. पण माझ्यात आता ती शक्तीही उरलेली नाही. पण मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी माझ्यासाठी हा दिवस खास बनवला. मी माझ्या मुलाला कुशीत घेणे हीच माझ्यासाठी अल्लाहने दिलेली सर्वोत्तम भेट आहे.मी दरवर्षी माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या सर्व मातांसाठी मातृदिनी पोस्ट लिहित असते. पण माझ्यासाठी मदर्स डे २०२३ ची सर्वात खास गोष्ट म्हणजे माझ्या आईने मला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. बेटा तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!’

Tags: Gauhar KhanInstagram PostViral Photoviral postZaid Darbar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group