Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुझ्या जिद्दीला सलाम’; हार्ट सर्जरीनंतर आठवड्याभरातचं सुश्मिताने सुरु केलं फिटनेस वर्कआऊट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 8, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sushmita Sen
0
SHARES
113
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच आपल्या फिट आणि फाईन रुटीनमुळे तसेच वयाची चाळीशी उलटूनही सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री सुश्मिता सेन नेहमीच चर्चेत राहिली आहे. आपल्या फिटनेसबाबत सुश्मिता किती चोख आहे हे आपण सारेच जाणतो. सुश्मिता सेनला २७ फेब्रुवारी रोजी शुटींग दरम्यान सेटवरच हार्ट अटॅक आला होता. ज्यामुळे तिला तात्काळ उपचारांसाठी मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

तिच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेजेस होते. ज्यामुळे तिच्यावर लगेचच एन्जिओप्लास्टी करण्यात आली. याची माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आणि त्यानंतर लाईव्ह येत चाहत्यांची भेटदेखील घेतली. यानंतर आता सुश्मिता आराम करत असेल असे सगळ्यांना वाटत होते. पण सुश्मिताचा वर्कआउट करतानाचा फोटो समोर आल्याने सगळेच अवाक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

खरंतर सुश्मिताने आता आराम करणे तिच्यासाठी योग्य असताना तिने फिटनेसला ब्रेक दिलेला नाही हे पाहून तिचे कौतुक करावे कि आणखी काही.. हेच कळेनासे झाले आहे. कारण हार्ट अटॅकच्या घटनेला साधा आठवडा पूर्ण होत नाही तोवरच सुश्मिता वर्क आऊट करतं असल्याचे समोर आले आहे. सुश्मिताने स्वतःच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘व्हिल ऑफ लाइफ. माझ्या कार्डिओलॉजिस्टनं वर्कआऊट करायला परवानगी दिली आहे. स्ट्रेचिंग सुरू केलं आहे. ही माझी हॅप्पी होळी होती आणि तुमची..? सर्वांना खूप खूप प्रेम’. या फोटोत सुश्मिता स्ट्रेचिंग व्हिलवर योगा करताना दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुश्मिताच्या जिद्दीला तिचे चाहते सलाम करत आहेत. तसेच तिच्या तब्येतीबाबत चिंतादेखील व्यक्त करत आहेत. पण जगण्याच्या इतक्या धीट शैलीसाठी तिचे करावे तितके कौतुक कमीच!! एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘जर प्रत्येक स्त्रीने तुमच्यासारखी विचारसरणी ठेवली तर जग बदलेल’. अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘तुझी हि आणि मागील पोस्ट पाहून खरोखर आनंद झाला. तुझ्यासाठी हे सर्व किती भयानक असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.. पण तुझी जिद्द खरंच प्रेरणादायी आहे’. आणखी एकाने लिहिलंय कि, ‘तू आमच्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान आहेस. आम्ही नेहमीच तुला आणि तुझ्या जीवनशैलीला फॉलो करत असतो. तुझा हसरा चेहरा, अस्खलित वक्तृत्व, ग्लॅमरस लूक याशिवाय आता तुझी जिद्द खरंच प्रेरणादायी आहे. देव तुला सदैव आशीर्वाद देवो आणि तुला तंदुरुस्त ठेवो’.

Tags: Bollywood ActressInstagram PostSushmita SenViral PhotoViral VideoYoga Stories
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group