Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मुंबईनंतर समंथाने आता ‘या’ ठिकाणी खरेदी केले आलिशान घर; किंमत ऐकून येईल चक्कर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Samantha Ruth Prabhu
0
SHARES
58
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. समंथा तिच्या घटस्फोटानंतर सिंगल लाईफ जगते आहे. दरम्यान तिच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स बाजूला ठेऊन ती स्वतःला कामात गुंतवून घेते आहे. अलीकडेच तिचा शाकुंतलम हा चित्रपट प्रदर्शित झाला. जो फारसा कमाई करू शकला नाही. मात्र समंथाच्या सौंदर्याने जादू चालवली. समंथा जाहिराती, चित्रपट यांमधून कमाई करते आणि अशा प्रोजेक्टसाठी ती मोठी रक्कम मानधन म्हणून आकारते. सध्या तिने खरेदी केलेल्या नव्या घराबाबत मोठी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत तिने अपार्टमेंट खरेदी केल्याचे समोर आले होते. यानंतर आता समंथाने नवं घर कुठे घेतलंय जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभुने आणखी एका प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. अलीकडेच फेब्रुवारी महिन्यात तिने मुंबईत एक घर खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता तिने हैदराबादमध्ये नव्या आलिशान घराची खरेदी केली आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, या फ्लॅटची किंमत ७.८ कोटी रुपये इतकी आहे. शिवाय समंथाने खरेदी केलेला फ्लॅट हा लॅविश थ्री बीएचके फ्लॅट असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे घरातून सी व्ह्यू दिसतो.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

इतकेच नव्हे तर समंथाच्या नव्या घरासोबत ६ पार्किंग स्लॉट आहेत. माहितीनुसार, हे आलिशान घर जयभेरी ऑरेंज काउंटी येथे आहे. अत्यंत मॉडर्न पद्धतीचा हा आलिशान फ्लॅट संपूर्ण सोई सुविधांनी परिपूर्ण आहे. याआधी अलीकडेच फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री समंथाने मुंबईत १५ कोटींचे अपार्टमेंट खरेदी केले आहे. याशिवाय तिचे जुबली हिल्समध्ये १०० कोटींचे आलिशान घर देखील आहे. यानंतर आता समंथाने आणखी एका प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली असून ती आता एका आलिशान घराची मालकीण बनली आहे.

Tags: Instagram PostSamantha PrabhuSouth ActressViral NewsViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group