Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रभास- क्रितीनंतर ‘राम- सिया’च्या भूमिकेत दिसणार रणबीर- आलिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
556
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रामायण’ या महाकाव्यावर येत्या १६ जून २०२३ रोजी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा येतो आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये तुफान उत्सुकता आहे. अशातच आता रामायण अनुभवण्याची आणखी एक संधी घेऊन ‘दंगल’ फेम दिग्दर्शक नितेश तिवारी नवा सिनेमा बनवणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर तर माता सीतेच्या भूमिकेत त्याची पत्नी अर्थात अभिनेत्री आलिया भट्ट कपूर दिसणार आहे, असे सांगितले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, नितेश तिवारी बनवत असलेल्या रामायणावर आधारित सिनेमामध्ये माता सीता आणि प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची निवड झाली आहे. याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अलीकडेच आलिया भट्ट आणि नितेश तिवारी यांची भेट झाली होती. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. याच भेटीदरम्यान आलियाने नितेश यांच्या सिनेमासाठी माता सीता हि भूमिका साकारण्यासाठी साइन केल्याची चर्चा आहे. याशिवाय रणबीर कपूर गेल्या काही आठवड्यांपासून डीएनईजी ऑफिसमध्ये (व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन स्टुडिओ) जाताना अनेकदा दिसला आहे. असं बोललं जात आहे कि, या सिनेमाचं प्लॅनिंग इथे सुरु आहे.

NITESH TIWARI’S #RAMAYAN 🔥#RanbirKapoor as Lord Ram#AliaBhatt as Sita#Yash as Raavan

Directed by : Nitesh Tiwari pic.twitter.com/yZl2b9JWRd

— Review Bollywood ™ (@ReviewBollywoo1) June 7, 2023

असेही सांगितले जात आहे कि, या सिनेमातील जग कसे असावे याचे प्री- व्हिज्युअलायझेशन करण्यात आले आहे आणि सिनेमाची टीम प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी रणबीरचा लुक टेस्ट करत आहे. याकरता रणबीर त्याच्या शरीर यष्टीवर कामदेखील करत आहे. असेही म्हटले जात आहे कि, या सिनेमाची अधिकृत घोषणा यंदाच्या दिवाळीत केली जाणार आहे. महत्वाचे असे कि, श्रीराम आणि सीता या भूमिकांशिवाय रामायणातील अविभाज्य पात्र रावण या भूमिकेसाठी ‘KGF’ स्टार यशसोबत मेकरची बातचीत सुरु आहे. अल्लू अरविंद, मधु मंटेना आणि नमित मल्होत्रा ​या सिनेमाची निर्मिती तर नितेश तिवारी, रवी उदयवार दिग्दर्शन करणार आहेत. हा पॅन इंडिया सिनेमा २०२५ मध्ये रिलीज करण्याचे प्रयत्न असणार आहेत.

Tags: Alia BhatBollywood Upcoming MovieInstagram PostPinkvillaranbir kapoor
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group