हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर मोठा तमाशा निर्माण केला. ज्यामुळे सोशल मीडियासह विविध क्षेत्रातून रणवीरवर टीकेची झोड उठली. इतकंच नव्हे तर रणवीरविरोधात मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तर पुण्यात मनसे शारीरिक सेनेने नुसता राडा घातला. या दरम्यान रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मात्र काहीही बोलली नाही. पण तिने नुकतच अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपले कपल फोटोशूट शेअर केले आहे. जे तुफान चर्चेत आले आहे.
View this post on Instagram
रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर अभिनेत्री आणि त्याची पत्नी दीपिकाने हे नवं फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या फोटोशूटमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. रणवीर सिंगने पांढऱ्या आणि काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर दीपिका पदुकोणने क्रीम- व्हाईट कलरचा लेहेंगा परिधान केला आहे. शिवाय तिचा आय मेकअप अतिशय लक्षवेधी झाला आहे. दीपिका आणि रणवीरच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. खूप दिवसांनंतर त्यांनी असं फोटोशूट केलं आहे. जे कॉंट्रोव्हर्सीनंतर आणखीच मोठ्या चर्चेचा भाग झाला आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना त्यांचे हे फोटो प्रचंड आवडल्याचे दिसते आहे.
रणवीर सिंगच्या या फोटोशूटवरून गेल्या काही दिवसांपासून बराच गदारोळ झाला. इतकंच काय तर रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच अडचणीतसुद्धा सापडला आहे. रणवीरवर मुंबईत एफआयआर दाखल झाली. यानंतर इंदूरमध्येही रणवीरच्या फोटोशूटवर निषेध दर्शविण्यात आला. इतर अनेक लोकांनी रणवीरवर टीका केली. मात्र बॉलीवूड मधील अनेक मंडळींनी रणवीर सिंगच्या समर्थनार्थ आपले मत मांडले. ‘हे त्याच काम आहे आणि त्याला योग्य वाटतं तेच त्यानं करावं.’ अशा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
Discussion about this post