हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण माने यांना मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. यानंतर हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. यानंतर मालिकेचे साताऱ्यातील वाई तालुक्यातील गुळुंब या गावात सुरू असलेले शूटिंग बंद करण्याबाबतचे सरपंचाच्या सहीचे पत्र व्हायरल झाले. परंतु तरीही गावामध्ये शूटिंग सुरू आहे. या बद्दल सरपंच स्वाती माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा सर्व प्रकार आणखीच धक्का देणारा आहे.
अभिनेते किरण माने समाज माध्यमातून राजकीय पाेस्ट केल्याने त्यांना मालिकेतून काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान मानेंवर करण्यात आलेली कारवाई पाहता त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेसह राजकीय मंडळी ठामपणे उभी राहिली आहेत. यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच अभिनेते माने यांनी तक्रार दिल्यास राज्य शासन याेग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान मूलगी झाली हाे या मालिकेचे शुटींग तातडीने बंद करा असे पत्र वाई तालुक्यातील गुळुंबचे सरपंच स्वामी माने यांच्या सहीचे समाज माध्यमातून व्हायरल झालं आहे. मात्र, तरीही आज गुळूंब येथे मालिकेचे शूटींग सुरू असल्याचे दिसून आले.
या गावात सुरू असलेले शूटिंग बंद करा असा आशय पत्रात नमूद आहे. दरम्यान गावामध्ये सध्या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. याबद्दल सरपंच स्वाती माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
Discussion about this post