Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रिचा चड्ढावर भारतीय लष्कराची खिल्ली उडविल्याचा आरोप; ट्विट करीत अभिनेत्रीने मागितली माफी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 24, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Richa Chaddha
0
SHARES
58
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री रिचा चढ्ढा हि सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत असते. ज्यामुळे ती कितीतरी वेळा ट्रोलदेखील झाली आहे. नुकतेच रिचाने लष्कराबाबत एक ट्विट केले होते. ज्यानुसार तिच्यावर लष्कराचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर या ट्विटसाठी तिला ट्रोल केले जात आहे. या ट्रोलिंगनंतर तिने पुन्हा एकदा ट्विट करीत स्पष्टीकरण दिले आहे.

उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी आता पूर्ण तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्याकरिता आम्ही सज्ज आहोत. याचा संदर्भ देत रिचाने ट्विट केले होते कि, ‘गलवान ही कह रहा है’. यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट केले कि, ‘अभद्र ट्विट. ते लवकर मागे घेतले पाहिजे, आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे योग्य नाही.’गलवानमध्ये २०२० साली भारत- चीनमध्ये जो हिंसक संघर्ष झाला त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर भारत- चीनचे संबंध तणावपूर्ण झाले. म्हणूनच नेटकरी रिचाच्या या ट्विटवर नाराज आहेत.

Mumbai | An actor Richa Chadha has made a joke dragging Galwan valley in her tweet. I demand the CM & HM to take stringent action on this. Such actors, who make anti-national tweets should be banned: Shiv Sena Spox (Uddhav faction) Anand Dubey pic.twitter.com/qOiXcl6J4Q

— ANI (@ANI) November 24, 2022

सोशल मिडियावर चालू ट्रोलिंग पाहून रिचाने स्पष्टीकरण देणारे एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे कि, याबाबत माझा उद्देश कधीच वाईट असू शकत नाही, तरीही वादात ओढल्या गेलेल्या माझ्या ३ शब्दांमुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी माफी मागते आणि हे देखील सांगते की अनावधानाने माझ्या शब्दांमुळे कोणालाही माझ्या भावना चुकीच्या वाटल्या असतील मला या गोष्टीचे वाईट वाटत आहे. माझे बंधू ज्या फौजेत आहेत, माझे स्वतःचे नानाजी ज्याचा एक उल्लेखनीय भाग होते.

@BediSaveena pic.twitter.com/EYHeS75AjS

— RichaChadha (@RichaChadha) November 24, 2022

लेफ्टनंट कर्नल म्हणून १९६० च्या भारत-चीन युद्धात त्यांच्या पायात गोळी लागली होती. माझे मामाजी पॅराट्रूपर होते. हे माझ्या रक्तात आहे. आपल्यासारख्या लोकांपासून बनलेल्या राष्ट्राला वाचवताना त्यांचा मुलगा शहीद होतो किंवा जखमी होतो तेव्हा संपूर्ण कुटुंब प्रभावित होते आणि ते कसे वाटते हे मला वैयक्तिकरित्या माहित आहे. हा माझ्यासाठी भावनिक मुद्दा आहे.’

Tags: Bollywood ActressOffensive Statementricha chaddhaTweeter Postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group