हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हरियाणवी डान्सर आणि प्रसिद्ध गायिका सपना चौधरीने तिच्या लटके झटके आणि मादक अदांच्या जोरावर अख्खी पब्लिक खुळावून सोडलं आहे. सपनाच्या करिअरची सुरुवात हरियाणाच्या ऑर्केस्ट्रापासून झाली आणि त्यानंतर तिने स्टेज डान्स करायला सुरुवात केली. आज ती एक प्रसिद्ध हरियाणवी डान्सर म्हणून ओळखली जाते. शिवाय तिने ‘बिग बॉस ११’मध्येही कल्ला केला होता. आता तिचा स्वतःचा एक वेगळा आणि भाला मोठा चाहता वर्ग आहे. ती कायमच आपल्या चाहत्यांच्या चर्चेचा भाग असते. नुकताच सपना आणि तिच्या चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
गायिका आणि डान्सर सपना चौधरी हि नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे चर्चेत राहिली आहे. एका छोट्याशा गावातून आलेल्या सपनाने आज कलाविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. दरम्यान सपना आता पुन्हा एकदा या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सपनाचे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करतात हे काही नवीन म्हणून सांगायला नको. पण काही चाहते मात्र सपनाला देवीचा दर्जा देतात एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. नुकताच सपना चौधरीच्या स्टेज शोचा एक बराच जुना व्हिडिओ सोशल मीडियावर अचानक व्हायरल होऊ लागला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सपनाचे पाय धुतांना दिसतोय आणि त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
हा व्हिडीओ सपनाच्या एका सतेज शोचा आहे. यामध्ये सपना स्टेजवर बसली आहे आणि तिचा एक चाहता तिचे पाय धुताना दिसतोय. या व्यक्तीने प्लेटमध्ये गुलाबाची पाने पसरवली आणि त्यानंतर पाण्याची बाटली घेत सपनाचे पाय धुतले. यावेळी सपनाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. यानंतर तो व्यक्ती स्टेजवर सर्वांसमोर सपनाचे पाय धुतलेले पाणी पितो आणि स्वतःवर ओतून घेतो. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी टीकांचा वर्षाव केला आहे.हे कृत्य विचित्र आणि किळस आणणारं आहे असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. या व्हिडिओवर ट्रोलिंग सुरु होताच कमेंट्सचा ऑप्शन ऑफ करण्यात आला आहे.
Discussion about this post