हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बी स्टारर ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी रिलीज झाल्यानंतर सर्वांच्या तोंडावर याच चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटातील हटके डायलॉग, कलाकारांचा साधा आणि सत्यवादी अभिनय, गाण्यांमधील झिंग असा झुंड प्रेक्षकांसह समीक्षकांनाही चांगलाच भावला आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवले होते. यासाठी अनेक दिग्गज कलाकार, समीक्षक, दिग्दर्शक, निर्माते आणि इंडस्ट्रीशी संबंधित अनेकांना आमंत्रण दिले होते. यानंतरही दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पहा सांगत या चित्रपटाला ऑस्कर मिळायला हवा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
— Nagraj Popatrao Manjule (@Nagrajmanjule) March 4, 2022
झुंड चित्रपट पाहिल्यानंतर अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटावर नुसता कौतुकाचा वर्षाव केला आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटातील कलाकारांना शाबासकीची थाप देखील दिली आहे. यामध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले कि, ‘मी आतापर्यंत पाहिलेला सर्वाधिक चांगला चित्रपट हा झुंड चित्रपट आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर आता प्रेक्षकांच्या रांगाच रांगा लागुदेत.’ तसंच दिग्दर्शक ओम राऊत यांनी म्हटले कि, “प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट जरूर बघायला हवा.’ तर दिग्दर्शक संदीप वैद्य यांनी म्हटलं कि, ‘एका वेगळ्याच लेव्हलचा हा सिनेमा आहे, मला खूपच आवडला. तर मिलोप झवेरी यांनी “झुंड हा मास्टर पीस आहे अशी म्हटलंय. तर एका दिग्दर्शकाने ‘भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला पाहिजे’ थेट असे म्हटले आहे.
‘झुंड’ हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित चित्रपट आहे. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारत आहेत. नागराज मंजुळे यांना या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी २ वर्षांचा वेळ लागला. हि कथा लिहिताना त्यांनी अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षकाचं पात्र लिहिलं आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं विजय बारसे हे पात्र बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
Discussion about this post