हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फ्रान्समध्ये कान्स शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला असून या सोहळ्याची बॉलिवूड सेलिब्रिटी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी या महोत्सवात बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या हटके लूकने चारचाँद लावताना दिसतात. याहीवेळी अनेक सेलिब्रिटींचे लूक कातिलाना ठरले आहेत. पण आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यावेळी कुठेतरी कमी पडल्याचे दिसून आले आहे. या फेस्टसाठी ऐश्वर्याने केलेला लूक पाहून नेटकऱ्यांना काय बोलावं तेच सुचेनासं झालं आहे. त्यामुळे ऐश्वर्याचा या फेस्टमधील लूक समोर आल्यापासून जे ट्रोलिंग सुरु झालं आहे ते अजून चालूच आहे.
माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आणि कान्स महोत्सवातील रेड कार्पेटचे नाते जुने आहे. वयाच्या २१ व्या वर्षी तिने पहिल्यांदा कान्सच्या महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता. तेव्हापासून ऐश्वर्या कान्सचे खास आकर्षण राहिली आहे. म्हणूनच यंदाही ऐश्वर्याचा लुक काय असेल..? याबाबत सर्वांमध्ये एक वेगळीच उत्सुकता होती.
पण जेव्हा ऐश्वर्याचा हा लूक समोर आला तेव्हा मात्र तिच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली. ऐश्वर्याने या फेस्टसाठी सिल्व्हर आऊटफिट परिधान केला होता. सोबतच नेहमीची हेअर स्टाईल आणि डार्क रेड लिपस्टिक. ऐश्वर्याचा हा अल्युमिनियम क्रिस्टल पेहराव पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर ट्रोलिंगची बरसात केली आहे.
ऐश्वर्याने हा लूक अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला असता एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘सगळ्यात आधी हिचे केस कापा आणि मग हिच्या लाल लिपस्टिकला आग लावा’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘फॅशन वर्ल्ड मधून या अल्युमिनियम क्वीनला हाकलून द्या’. तसेच अन्य एकाने लिहिले, ‘तुला हेअर स्टायलिस्टची गरज आहे.. प्लिज ते केस कापून टाक. सोबतच एक नवा फॅशन डिझायनर पण बघ..’, आणखी एका युजरने म्हटलंय, ‘जेव्हा थंडीच्या दिवसात तुम्हाला ब्लॅंकेटच्या बाहेर येऊ वाटत नाही तेव्हा.. पण एक मिनिट. आता तर उन्हाळा चालू आहे मॅडम’.
Discussion about this post