हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण आणि शेरशहा म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्रा हे अत्यंत लोकप्रिय कलाकार आहेत. यांचा ‘थॅंक गॉड’ हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे दोघेही प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. पण ट्रोलर्सने जादूची काडी फिरवली आणि ‘बॉयकॉट थॅंक गॉड’ ट्रेंड होऊ लागला. या चित्रपटात देवतांचा अपमान करण्यात आलाय असा ट्रेंड मोठा झाला. परिणामी अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह थॅंक गॉड चित्रपटाचे दिग्दर्शक इंदर कुमार यांच्याविरोधात थेट कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कायदेशीररित्या ‘थँक गॉड’ हा चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता आहे. हिंदू देव देवतांचा अपमान करून हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं कारण पुढे करत हि केस दाखल करण्यात आली आहे. वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी उत्तर प्रदेशच्या जौनपूर कोर्टामध्ये अभिनेता अजय देवगण, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिग्दर्शक इंदर कुमार यांच्या विरोधात हि तक्रार दाखल केल्याचे समजत आहे. या चित्रपटात अजय देवगण चित्रगुप्त हि भूमिका साकारतोय आणि पाप- पुण्याचं मोजमाप करतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कमी कपडे घातलेल्या मुली चित्रगुप्त भूमिकेतील अजयच्या मागे उभ्या दिसत आहेत. याच गोष्टीवर लोकांनी बोट ठेवत संताप व्यक्त केला आहे.
वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी संबंधित प्रकरणात मेकर्स आणि अभिनेत्यांवर चार्ज लावत तक्रार दाखल केली आहे. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे की, ‘अजय देवगण हा ता चित्रपटात चित्रगुप्त बनला आहे. एका सीनमध्ये तो विनोद करताना देवाचा अपमान होईल अशी भाषासुद्धा वापरताना दिसत आहे. हिंदू धर्मात चित्रगुप्ताला कर्मदेवता म्हणून संबोधलं जातं. तो माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. पण ट्रेलरमध्ये जे काही दाखवलं आहे त्यानं धार्मिक भावना दुखावण्याचा संभव आहे. ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते’. ‘थॅंक गॉड’ या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत अभिनेत्री राकुल प्रीत सिंग, नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कायदेशीर अडचणीतून सुटल्यास हा सिनेमा २४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होईल.
Discussion about this post