हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी साळगांवकर कुटुंबाची गोष्ट पूर्ण होणार आहे. कारण या दिवशी ‘दृश्यम २’ हा चित्रपट आपल्या भेटीस येतो आहे. त्याआधी या चित्रपटाचा उत्सुकता वाढविणारा आणि गोंधळात टाकणारा सस्पेंस ट्रेलर रिलीज झाला आणि सर्वत्र चर्चा सुरु झाली कि, हिंदी व्हर्जन बेस्ट..? का साऊथ व्हर्जन. कारण साऊथचा दृश्यम २ कमालीचा सुपरहिट ठरला आहे. यामुळे हिंदी दृश्यम २ त्याच्यासमोर तोडीचा ठरेल का..? या चित्रपटात साऊथ व्हर्जनची कथा तंतोतंत सामील असेल का..? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. याचे उत्तर अभियन्ता अजय देवगण याने दिले आहे.
आतापर्यंत बॉलिवूडमध्ये साऊथचे जेव्हढे चित्रपट रिमेक होऊन आले त्याकडे प्रेक्षकांनी ढुंकूनही पाहिलं नाही आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर देणे अजय देवगण आणि ‘दृश्यम २’ चा दिग्दर्शक अभिषेक पाठक यांना आवश्यक वाटले. त्यांनी सांगितले कि, हा सिनेमा मोहनलालच्या सिनेमापेक्षा खूप वेगळा आहे. यामध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. नवीन व्यक्तिरेखांचा समावेश केला आहे. मल्याळम चित्रपटाचे नावदेखील ‘दृश्यम’ आहे. जे रिमेक करताना बदललेलं नाही. मल्याळम सिनेमात मोहनलाल लीड रोल मध्ये आहे. या सिनेमाचे मल्याळम आणि तेलुगु व्हर्जन OTT वर रीलिज झालेले आहेत. अशातच अजय देवगण आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक यांचा सिनेमा तसाच कि नवीन असा प्रश्न पडणे फार साहजिक आहे.
याबाबत गोव्यात ‘दृश्यम २’ च्या ट्रेलर लॉंच दरम्यान अजय देवगणने सांगितले कि, ‘ ‘दृश्यम 2′ मध्ये अनेक नवीन व्यक्तिरेखांचा समावेश करण्यात आला असून खूप बदल केले आहेत. लोकांनी मल्याळम व्हर्जनमध्ये अक्षय आणि गायतोंडे या दोन व्यक्तिरेखा पाहिलेल्या नाहीत. त्यामुळे यात खूप गोष्टी नवीन आहेत. तरीही असं करताना सिनेमाचा आत्मा मात्र तसाच आहे. त्याच्याशी छेडछाड केली नाही. त्यामुळे मला वाटतं की सिनेमा पाहिल्यावर लोकांना काहातरी नवीन पाहतोय असं नक्की वाटेल.’
याबाबत बोलताना दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाला की, ‘सिनेमाची कथा फुलवण्यातच मी खूप महिने घेतले. यात खूप गोष्टी दिसतील ज्या मल्याळम, तेलुगूत नाहीत. जेव्हा सिनेमा लिहायला घेतला तेव्हा आम्ही लगेच शुटिंग सुरू केलं नाही. कारण सिनेमा लिहिण्यात ७ महिने गेले. यात खूप बदल केले गेले आणि म्हणून हिंदी व्हर्जन हा मल्याळम, तेलुगू पेक्षा एकदम वेगळा आहे.’आता उत्सुकता हि आहे कि, ‘दृश्यम २’ मध्ये साळगांवर कुटुंबाने लपवलेलं सत्य बाहेर येणार का..? विजय साळगावकर पुन्हा पोलिसांना चकवा देईल का.. ?
Discussion about this post