हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या रविवारी शेरशहा फेम बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या वेडिंग रिसेप्शनच्या पार्टीमध्ये जवळजवळ संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होत. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपापल्या मुलांसोबत दिसले. यामुळे साहजिकच ग्रँड इव्हेंटमध्ये स्टार किड्सची चर्चा राहिली. या पार्टीला अनेक दिग्गजांच्या मुलांनी आपली हजेरी लावली होती. यामध्ये बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा देवगणदेखील होती. मात्र, पार्टीनंतर तिची अवस्था अगदी पाहण्यासारखी झाली होती. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे.
अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची लेक न्यासा देवगण कमीवेळा अशा पार्टीजमध्ये स्पॉट होते. पण जेव्हा केव्हा स्पॉट होते तेव्हा चर्चेत आल्याशिवाय राहत नाही. याहीवेळी असेच काहीसे झाले आहे. या पार्टीतील तिचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत न्यासा गाडीतून उतरत पार्टीमध्ये जाताना दिसत आहे. तिने फॅन्सी ग्लोरी पिंक कलरचा वन पीस परिधान केल्याचे दिसत आहे. ती पार्टीत जात असताना पॅपराझींनी तिला स्पॉट केले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना तिने परिधान केलल्या ड्रेसमुळे आणि तीच्या वर्तनामुळे तिच्यावर टीका झाली.
यापूर्वीही न्यासाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती बॉयफ्रेंडसोबत होती. यानंतर आता न्यासाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती नशेत चालताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी टीका करताना दिसत आहेत. अनेक जणांनी कमेंट करीत तिला ट्रोल केले आहे.
एकाने लिहले आहे ‘बाप रे बाप हिच्या ड्रेसिंग सेन्सला सलाम’. तर दुसऱ्याने लिहले आहे, ‘नक्की हिने परिधान तरी काय केले आहे…?’ तसेच आणखी एकाने लिहले आहे, ‘ही अचानक गोरी कशी काय झाली?’ . तर आणखी एका नेटकऱ्याने लिहले आहे ‘तिचा ड्रेस खूपच विचित्र आहे’. याशिवाय अनेकांचे म्हणणे आहे कि, ‘ती कायम नशेत असते’.
Discussion about this post