Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अजिंक्य देव करणार या चित्रपटाद्वारे मराठीत पुनरागमन

tdadmin by tdadmin
February 29, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेला आणि एक चांगला अभिनेता अशी ओळख असलेला अजिंक्य देव लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘नागपूर अधिवेशन’ हा त्याचा मराठीतील शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर अजिंक्य देवने अभिनयाचा मोर्चा बॉलिवूड कडे वळवला. अनेक हिंदी आणि इंग्लिश चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसून आलेला अजिंक्य देव याने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने आपला ठसा उमटविला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात सुद्धा तो एका महत्वाच्या भूमिकेत दिसला. आता ‘झोलझाल’ या आगामी मराठी चित्रपटात अजिंक्य देव ‘अभिमन्यू शिंदे’ या एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

यामध्ये अजिंक्य एका महत्वाच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव याच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू रसिकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाविषयी अजिंक्य देव म्हणाला, “मराठीत बऱ्याच दिवसांनी काम करताना मला खूप आनंद होतोय. माझ्या इतर कामं मध्ये व्यस्त असल्याने मी गेली काही वर्षे मराठी चित्रपटापासून लांब होतो. मराठी चित्रपट तर करायचा होता. मात्र मला हवी तशी भूमिका मिळत नव्हती. मी अशा भूमिकेची वाट बघत होतो जी माझ्यासाठीच बनली असेल. ‘झोलझाल’या चित्रपटाने माझी ही इच्छा पूर्ण केली. हा चित्रपट करण्यामागचं महत्वाचे कारण म्हणजे मला या चित्रपटातील माझी भूमिका प्रचंड आवडली. या चित्रपटातील माझ्या ‘अभिमन्यू’ या भूमिकेला गंभीर, विनोदी,तत्वनिष्ठ आदी असे अनेक पैलू आहेत. माझ्या अभिनयाचे विविध पैलू या एकाच चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अशा वेगळ्या पद्धतीचा अभिनय करायला मिळणार या विचारानेच मी खुश झालो आणि मी होकार दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा एक्शन करताना दिसणार आहे.”

मानस कुमार दास यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘झोलझाल’ या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले आहे. अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता तर शिवाजी डावखर यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे. येत्या १ मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: ajinkya deojholjhalmarathi actormarathi artistMarathi Movieअजिंक्य देवआनंद गुप्ताझोलझालमराठी चित्रपटसृष्टीमानस कुमार दासरश्मी अग्रवालविनय अग्रवाल
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group