हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह या वाहिनीवर येत्या २६ जुलै २०२१ पासून ‘जय भवानी जय शिवाजी’ हि ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांसाठी येणार आहे. या मालिकेची आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. कारण यात पुन्हा एकदा राजे आपल्या भेटीला येणार आहेत. मात्र या मालिकेत स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधड्या छातीच्या ढाण्या शिलेदाराची शौर्यगाथा उलगडणार आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अजिंक्य देव हे बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार आहेत आणि मोठ्या विश्रांतीनंतर थेट छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत.
Coming soon pic.twitter.com/YgQqln5jso
— Ajinkya Deo (@Ajinkyad) June 15, 2021
या भूमिकेविषयी व्यक्त होताना अजिंक्य देव म्हणाले, ‘माझ्या करिअरची सुरुवातच मी सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने केली होती. त्यामुळे बाजीप्रभू यांची भूमिका साकारताना मला प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे.
फिटनेसच्या बाबतीच मी नेहमीच जागृक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे. स्टार प्रवाह सध्याची नंबर वन वाहिनी आहे. याआधी प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमाच्या काही भागांचं मी सूत्रसंचालन केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत या मालिकेच्या निमित्ताने काम करण्याचा योग आला आहे.’
https://www.instagram.com/tv/CNmL8AYj06v/?utm_source=ig_web_copy_link
‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून येत्या २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाह कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले कि, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. आकाश ठेंगणं पडेल असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजा असावा तर असा. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अश्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे.सध्या या मालिकेची सर्वानाच उत्सुकता लागलेली आहे कारण पुन्हा एकदा घराघरांत घडणार छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन आणि त्यांच्या शिलेदारांची भक्ती अनुभवायची मिळणार संधी.
Discussion about this post