हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कलर्स मराठीच्या बिग बॉस मराठी सीजन ४मध्ये ‘महाटास्क’सुरू आहे. ज्याचं नाव ‘सी सॉ’ असं आहे. हा टास्क जिंकायला घरात विभागून दिलेल्या दोन्ही टीम जीव ओतून खेळत आहेत. एकीकडे सगळे स्पर्धक आपापल्या टीमसाठी काहीही करून जिंकायची मनषा ठेवून आहेत. तर दुसरीकडे अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांमध्ये एका मेकअप बॉक्सवरून बाचाबाची झाली आहे. होय. एका मेकअप बॉक्समुळे अक्षय आणि अमृता यांच्यात जोरदार आरडा ओरडा करत भांडणं झाली आहेत.
कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दिसतंय कि, ‘अमृताने अक्षयला बजावून सांगितले पाय नको मारुस मेकअप आहे माझा.’ यावर अमृताला अक्षय म्हणतो कि, ‘पाय मुद्दाम मारला का तुझ्या मेकअपला..?’ तर यावर अमृता म्हणते, ‘मी सांगून देखील पाय अजून तिथेच आहे तुझा.’ यावर पुन्हा अक्षय म्हणतो आहे कि, ‘मी मुद्दाम मारला का..? पाय मारला हे वाक्य म्हणू नकोस.’ यावर अजिबात न थांबता अमृताने प्रत्युत्तर देत म्हटले कि, ‘मग काय म्हणू.. ? दुसरं वाक्य काय आहे..? यावर परत एकदा अक्षय म्हणतो कि, ‘पाय लागला असं म्हण, तुझ्यासारखा मूर्ख आहे का मी..? चिटर कुठली रडी.’ या तू तू मै मै’चं रूपांतर कधी भांडणात झालं ते कळलंच नाही. पण एका मेकअप बॉक्सने हे भांडण गाजवलं.
मुख्य म्हणजे हे चालू झालेलं भांडण बराच वेळ सुरु होत. कारण अक्षयने चिटर आणि रडी म्हटल्यावर अमृताचा पारा आणखीच वाढला. त्यावर तिने पुन्हा प्रत्युत्तर देत म्हटलं कि, ‘तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे.’ ज्यावर अक्षय म्हणाला कि, ‘तेच म्हणणं आहे खूप फरक आहे आपल्यात म्हणूनच तुझ्याशी वाद नाही घालतं आहे.’ असं वाद घालत नाही म्हणून दोघेही एकमेकांसोबत चांगलेच वाद घालत आहेत हे स्पष्ट दिसत होते. यानंतर पुन्हा किचनमध्ये सुद्धा त्यांची भांडण होताना दिसली. बहुतेक या घरात ‘मैं तेरी दुश्मन.. दुश्मन तू मेरा’ असं एक समीकरण लवकरच सुरु होताना दिसणार आहे.
Discussion about this post