हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी दिसणार आहे. नुकताच अक्षयकुमारने या सिनेमाचा ट्रेलर 9 ऑक्टोबरला प्रदर्शित केला. या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या 24 तासात 70 मिलियन म्हणजेच 7 कोटीपेक्षा जास्त लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.
अभिनेता तुषार कपूरने एक पोस्ट शेअर करत या ट्रेलरला 70 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्याची माहिती दिली. लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरला इतकं प्रेम दिल्याबाबत धन्यवाद आणि याला भारतात 24 तासात सर्वात जास्त बघितला जाणारा ट्रेलर बनवण्यासाठीही, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं.
या चित्रपटाचा ट्रेलर 9 ऑक्टोबरला सोशल मीडियावरुन प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय कुमारने या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित केल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकची प्रशंसा झाली होती. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 9 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्माते करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’