Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अक्षय कुमारला स्टंट करणं पडलं महागात; ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या सेटवर खिलाडीचा अपघात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 24, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Akshay Kumar
0
SHARES
45
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपटात स्टंट करायचा म्हटलं कि, सर्रास कलाकारांना डमी आर्टिस्ट लागतो. पण बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्वतःचे स्टंट स्वतः करतो. म्हणूनच तर त्याला बॉलिवूडचा खिलाडी म्हणतात. पण यावेळी अक्षय कुमारला स्टंट करणं जरा महागातच पडलं आहे. आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना अक्षय कुमारला दुखापत झाल्याचे समजत आहे. या अपघातात अक्षयच्या गुढघ्याला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. या बातमीमुळे अक्षय कुमारचे चाहते चिंतेत पडले आहेत.

"Bade miyan aka @akshaykumar sir injured his knee while shooting for an action sequence today. It is not a very serious injury for now and he got braces on his knee. He continues to shoot for his close up scenes so schedule is on track".- @htcity

— Akshay Kumar 24×7 (@Akkistaan) March 23, 2023

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमूळे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दोघेही व्यस्त आहेत. या चित्रपटात हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा एक ऍक्शन सीन शूट करताना हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अभिनेता अक्षय कुमार जखमी झाला असला तरीही त्याला खूप गंभीर अशी कोणतीही दुखापत न झाल्याचे प्रोडक्शन टीमने सांगितले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग सुरु राहील. मात्र यावेळी अक्षय कुमारवर चित्रित करायचे कोणतेही स्पेशल ऍक्शन सीक्वेन्सचे शूट सध्या होणार नाही. बाकी सीन्सचे ठरलेल्या शेड्युलनुसार शूटिंग सुरु राहील, अशी माहिती मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘अक्षय कुमारचा टायगर श्रॉफसोबत ऍक्शन सीन सुरु होता. यामध्ये एके विशेष स्टंट करताना अक्षयला दुखापत झाली असून त्याच्या गुडघ्यावर ब्रेसेस आहेत. स्कॉटलंडमधले शूट वेळेत पूर्ण होण्यासाठी अक्षय सध्या क्लोज- अप्ससह शूट करतोय. मीडिया रिपोर्टनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या आगामी चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबत सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार देखील अन्य महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित करीत असलेला हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा सिक्वल आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Tags: akshay kumarBollywood Upcoming MovieInjured During ShootInstagram Posttiger shroff
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group