Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘भेदरलेलं शहर आणि मोकाट फिरणारा सिरीयल किलर’; ‘कट्पूतली’चा ट्रेलर चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 22, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
CuttPutlli
0
SHARES
19
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच विविध कथानकाच्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘कट्पूतली’ प्रचंड चर्चेत आहे. एक वेगळं आणि आकर्षक कथानक, मन भेदरवुन सोडणार आणि डोकं भंडावणारं… या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. सोबतच अभिनेता अक्षय कुमारचा फर्स्ट लुकदेखील सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. या चित्रपटात अक्षय पोलिसाच्या भूमिकेत आहे आणि तो एका सीरियल किलरच्या शोधात आहे. दरम्यान तो काय कमावतो आणि काय गमावतो हे पाहणे रंजन ठरणार आहे. हा एक सायको थ्रिलर चित्रपट असून याचे कथानक दाक्षिणात्य सिनेमा ‘रत्सासन’शी मिळते आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सह या चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग मुख्य महिला व्यक्तिरेखेत दिसणार आहे. ‘कट्पूतली’ची कथा हि कसौली नावाच्या एका शहरात घडणाऱ्या खुनांभोवती गुंफली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो कि, भेदरलेले शहर आणि मोकाट फिरणारा सिरीयल किलर यामुळे पोलिसांची दाणादाण उडाली आहे. यातील पोलिसाच्या मध्यवर्ती भूमिकेत अक्षय कुमार दिसतोय. तर एका शिक्षिकेच्या भूमिकेत अभिनेत्री रकुल प्रीत सिंग दिसणार आहे. हा ट्रेलर साधारण २ मिनिटांचा असून होश उडवणारा आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

या ट्रेलरमध्ये अक्षयआणि रकुलबरोबर अन्य मुख्य भूमिकेत सरगून मेहता, चंद्रचूड सिंग आणि गुरप्रीत घुग्गी देखील आहेत. यांची पोलिसांची एक टीम सीरियल किलरचा पाठलाग करताना दिसणार आहे. थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या कसौलीत खुनांचे हे सत्र सुरु झाले आहे. मुख्य म्हणजे मारेकऱ्याच्या निशाण्यावर केवळ आणि केवळ शाळकरी मुली आहेत. आतापर्यंत ३ खून झाले असून अक्षय आणि त्याच्या टीमकडे हे हत्याकांड थांबवण्यासाठी फक्त २ दिवस आहेत. या दोन दिवसात तो आणि त्याची टिम या खुन्याला पकडू शकेल का..? यासाठी ‘कट्पूतली’ हा चित्रपट येत्या २ सप्टेंबर २०२२ रोजी डिस्नी प्लस हाॅटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जरूर पहा.

Tags: akshay kumarCuttPutaliInstagram PostOfficial Trailerrakul preet singh
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group