हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडच्या काळात नाराज प्रेक्षकांनी बॉलिवूड सिने इंडस्ट्रीकडे पाठ वळवली आणि यामुळे सुपरस्टार असणाऱ्या कलाकरांनी देखील कच खाल्ली. सलग काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर शुल्लक कमाई करून धन्यता मानवी लागली. यामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्याही काही चित्रपटांचा समावेश आहे. जसे कि पृथ्वीराज, रक्षाबंधन. आता आगामी काळात त्याचा ‘रामसेतू’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या नावावरून प्रचंड वाद झाले. यानंतर आता सेन्सॉर बोर्डाने देखील या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत त्याला कात्री लावण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेता अक्षय कुमार याचा या वर्षातील ‘रामसेतू’ हा पाचवा चित्रपट आहे. आधीच्या एकही चित्रपटाने म्हणावी तशी कमाई न केल्यामुळे रामसेतूकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पण बॉयकॉट बॉलीवूडच्या ट्रेंडमूळे अक्षयच्या या चित्रपटाची नैय्या सुद्धा डुबणार का काय..? असे वाटू लागले आहे. गेल्या वर्षी अक्षयचा सुर्यवंशी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सलग जे चित्रपट आले ते सगळे कसे बसे चालले. आता तर रामसेतूकडून खूप अपेक्षा असताना तोही वादाच्या भोवऱ्यातून काही बाहेर येईना. त्यात रामसेतू नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे परिक्षणासाठी गेला होता. त्यांनी या चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिले आहे. यासोबत सीबीएफसीनं कोणताही सीन डिलीट केला नाही.
मात्र या दरम्यान बॉलीवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार या चित्रपटातील काही डायलॉगमध्ये हिंदू देवतांच्या नावाचा उल्लेख एकेरी केला गेला होता. जसे कि, श्रीराम यांचा उल्लेख राम आणि भगवान बुद्ध यांच्या नावाचा उल्लेख बुद्ध असा केला होता. याशिवाय काही संवाद बदलण्यासाठीदेखील सेन्सॉर बोर्ड आग्रही राहिले आहे. त्यांच्याकडून मेकर्सला सांगण्यात आले आहे कि, ‘श्रीराम कोणत्या कॉलेजमध्ये गेले होते’ यासारखे संवाद बदला. याचसोबत फायरिंग सीनवेळीदेखील श्रीराम यांच्या घोषणेचा उल्लेख आहे तो हटवण्यास सांगण्यात आले आहे.
Discussion about this post