Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आलिया भट्ट बनली लक्जरी फॅशन ब्रॅण्ड Gucci’ची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 11, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Alia bhatt
0
SHARES
59
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री आलिया भट्ट आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीतील महत्वाचे नाव आहे. आलियाने गेल्या काही काळात एकापेक्षा एक हटके सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. तिच्या सौंदर्यासह तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिला एक अढळ स्थान निर्माण करून दिले आहे. आलियाने साकारलेली गंगुबाई प्रेक्षकांच्या मनात पक्की वसली आहे. या भूमिकेसाठी आलियाने अनेक मनाचे पुरस्कार पटकावले आहेत. अशातच आता आणखी एक मानाचा तुरा तिच्या शिरपेचात रोवला गेला आहे. Gucci या लोकप्रिय लक्जरी फॅशन ब्रॅण्डची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आलियाची निवड झाली आहे. याबाबत तिने स्वतःच माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

टॉप लक्झरी फॅशन ब्रँडपैकी एक Gucci ने आलिया भट्टची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केल्यामुळे ती स्वतः आणि तिचे चाहते फार आनंदी झाले आहेत. इटालियन लक्झरी फॅशन हाऊसची ती पहिली भारतीय जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर ठरली आहे आणि याबाबत माहिती देताना तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर २ फोटो शेअर करत एक नोट लिहिली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे कि, ‘Gucci हाऊसचे केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्याचा मला सन्मान मिळाला आहे. Gucciच्या वारशाने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि उत्सुकता निर्माण केली आहे. यानंतर आता आम्ही एकत्रितपणे निर्माण केलेल्या अनेक टप्प्यांची मी वाट पाहत आहे’.

View this post on Instagram

A post shared by @gucci

आलियाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या या पोस्टवर तिची आई सोनी राजदान, जान्हवी कपूर, अनुष्का शर्मा अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. माहितीनुसार, आलिया भट्टला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केल्यानंतर गुच्ची क्रूझ रनवे २०२४ मध्ये ती सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम पुढील आठवड्यात १६ मे २०२३ रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी गुच्चीने आलिया भट्टला कंपनीची जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आणि यानंतर आता सार्वजनिकरित्या तिला या शोमध्ये सर्वांसमोर प्रेझेंट केले जाणार आहे.

Tags: alia bhattBollywood ActressBrand AmbassadorInstagram PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group