Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कायदेशीर वादात आलिया भटची कोंडी; ‘मान्यवर’च्या जाहिरातीमुळे मुंबईत तक्रार दाखल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट संध्या कायदेशीर अडचणीत अडकली आहे. इतकेच नव्हे तर आलियाविरोधात मुंबईत तक्रारसुद्दा दाखल झाली आहे. मान्यवर हा एक प्रसिद्ध ब्रँड असल्यामुळे अनेको सेलिब्रिटींनी आजपर्यंत त्यांच्या क्लोथिंग जाहिराती केल्याचे आपण जाणतोच. पण नुकतीच प्रदर्शित झालेली जाहिरात अर्थात ‘कन्यादान’ या जाहिरातीने मान्यवर ब्रॅण्डची प्रतिष्ठा आणि आलिया भट या दोघांचीही चांगलीच कोंडी केल्याचे दिसून येत आहे. या जाहिरातीमुळे आलिया आता चांगलीच कायदेशीर वादात सापडली आहे.

मुख्य म्हणजे, आलियाने या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप संबंधित तक्रारकर्त्याने केला आहे. मुंबईच्या लोकक्रांती सामाजिक संघटनेने मान्यवर हा ब्रँड आणि आलिया भटविरोधात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. संघटनेचे अध्यक्ष व पेशाने वकील असलेले विजेंद्र जाबराने यांनी संबंधित जाहिरात हिंदूविरोधी असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे आलियाची ही जाहिरात प्रदर्शित झाली, तेव्हापासूनच जबर वादात सापडली आहे. तिची ही जाहिरात भारतीय समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे, असे तक्रार कर्त्यांनी म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

‘मान्यवर मोहे’ हा कपड्यांचा एक ब्रँड आहे. याच्या जाहिरातीत आलिया भट्ट नवरीच्या साजश्रृंगारात मंडपात बसल्याचे दिसतेय. यावेळी मुलीच्या मनात येणारे प्रश्न ती अगदी सहज बोलून दाखवते. वडिलांचं घर मुलीचं का नसतं? मुलीला नेहमी परक्याचं धन का म्हटलं जातं? तिचं कन्यादान का केलं जातं? जाहिरातीच्या शेवटी मुलाचे आई-वडीलही आपल्या मुलाचा हात मुलीच्या हातात देण्यासाठी पुढे करतात आणि आलिया म्हणते, ‘नया आयडिया, कन्या मान’. हि जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर काहींनी तिच्या या जाहिरातीची प्रशंसा केली. पण त्यापेक्षा जास्त टीका या जाहिरातीवर झाल्याचे पाहायला मिळाले.

Tags: Aalia BhattLegal DisputesManyavarmumbai policeNew AdvertisementSocial Media Trollingtwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group