हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका स्त्रीसाठी आई होणे हि जगातील अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण तिच्या बाळाचा जन्म हा तिचा दुसरा जन्म असतो. आता इतर प्रत्येक नात्यासोबत तिचं आईपण फुलणार असतं. हा आनंद सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या पदरी पडला आहे. आलियाने रविवारी चिमुकल्या परीला जन्म दिला आणि ती आई झाली. यामुळे कपूर घरात नुसता आनंदी आनंद आहे. बाबा झालेला रणबीर तर आपल्या बाळाला पाहून भावुकही झाला होता. यानंतर आता रणबीर आलीयाची लेक घरी आली आहे.
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या चिमुकल्याचा परीची पहिली वहिली झलक पहायला मिळाली आहे. आलिया आणि रणबीर लेकीला घेऊन एचएन रिलायन्स हॉस्पिटलबाहेर पडतानाचा हा व्हिडिओ आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलिया त्यांच्या गाडीतून जाताना दिसत आहेत. यावेळी बाबा रणबीरने आपल्या लहान बाळाला हातात धरले आहे. जी अतिशय नाजूक असल्यामुळे तिला पूर्णपणे कपड्यांनी झाकलेली आहे. तर दुसरीकडे आलियाच्या चेहऱ्यावर आई झाल्याचा एक वेगळाच आनंद पहायला मिळतोय.
गेल्या रविवारी ६ नोव्हेंबर रोजी आलियाने बाळाला जन्म दिला. यानंतर आज चार दिवसांनंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रणबीर आणि आलिया त्यांच्या कपूर हाऊसमध्ये पोहोचले आहेत आणि परीचे तिच्या घरात जंगी स्वागत सुरु आहे. यावेळी आलिया आणि मुलीच्या स्वागतासाठी कपूर कुटुंबीयांनी घरी विशेष तयारी केली आहे. त्यामुळे आई आलियासह तिच्या बाळासाठी आजचा दिवस अत्यंत खास ठरणार आहे.
Discussion about this post