हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिने इंडस्ट्रीमध्ये पुष्पा फिव्हर काय आणि कसा आहे याबद्दल वेगळं लिहायची गरज नाहीच. चित्रपट येऊन गेल्याला कित्येक महिने उलटून गेले पण प्रेक्षक अजूनही पुष्पावर तेव्हढच प्रेम बरसवत आहेत. सोशल मीडियावर आजही पुष्पाच्या डायलॉग्सवरील रिल्स चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. अल्लु अर्जुनच्या पुष्पाने बॉक्स ऑफिस नुसता गाजवला नाही तर बॉक्स ऑफिसवर कल्ला केलाय. गतवर्षी डिसेंबरमध्ये ‘पुष्पा द राईज’ चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाचे प्रेक्षकांना वेध लागलेत. दरम्यान प्रेक्षकांचा पुष्पा म्हणजेच अल्लु अर्जुन त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आलाय.
तब्बल वीस वर्षानंतर पहिल्यांदाच एका पुरस्कार सोहळ्यात आपले मनोगत दिलखुलासपणे व्यक्त करताना अल्लू भावनिक झाला होता. बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याच्या या मनोगताला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. उत्तरेकडील एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालाय. यावेळी अल्लु अर्जुनचा भावूक चेहरा चाहत्यांनाही भावुक करून गेला. दिल्लीमध्ये अल्लुला इंडियन ऑफ द इयर 2022 या पुरस्कारानं गौरविण्यात आले. यावेळी तो बोलत होता.
आपल्या करिअरमध्ये आपल्याला पहिल्यांदाच उत्तरेकडील एका संस्थेने पुरस्कार देऊन गौरविल्याचा एक आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. दरम्यान व्यक्त होत तो म्हणाला कि, ‘गेल्या वीस वर्षांपासून मी फिल्म उद्योगात काम करतो आहे. मला दक्षिण भारतामध्ये खूप पुरस्कार मिळाले. पण पहिल्यांदाच उत्तर भारतामध्ये पुरस्कार मिळतो आहे याचा खास आनंद आहे. आपल्यात जे काही वाद आहे, विचारात भेद आहे तो यानिमित्तानं कमी होण्यास मदत होईल असे मला वाटते.
This words of @alluarjun garu shows how humble is this man and also show how he care about his fellow beings 🔥
He is not a reel star. He is a real Super star 💥
Proud to be fans of down to earth superstar #alluarjun 💪#Pushpa @PushpaMovie pic.twitter.com/xSo4kGuDuk
— Allu Arjun FC Kerala (@afwa_online) October 12, 2022
तुम्हाला माहिती आहे की, आपल्या देशाची विविधता किती सुंदर आहे. आपण त्यातून नेहमी काही ना काही शिकण्याची गरज आहे. जेव्हा पुष्पा तयार झाला तेव्हा साऱ्या देशानं त्याचं स्वागत केलं. त्यामुळे आपण सर्व फिल्म उद्योगाची मुलं आहोत हे लक्षात घेण्याची गरज आहे. यावेळी त्याने पुष्पा स्टाईलमध्ये ‘इंडिया कभी झुकेगा नही…’असे म्हणून साऱ्यांची मने जिंकली.
Discussion about this post