हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारे बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी विविध पोस्ट लिहित असतात. कधी सुविचार, कधी कविता ते ट्विटर, इन्स्टाग्राम व फेसबुकवर लिहितात. त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टमधून चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. आयुष्यात या सहा प्रकारच्या लोकांपासून कायम दूर राहा असं म्हणत त्यांना एक संस्कृत श्लोक लिहिला आहे.
संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगत त्यांनी पुढे लिहिलं, ‘सर्वांची ईर्ष्या करणारे, घृणा करणारे, सतत नाखूश राहणारे, रागीट, सतत शंका घेणारे आणि इतरांवर अवलंबून असणारे… हे सहा प्रकारचे लोक नेहमी दु:खी असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूरच राहिलं पाहिजे.’
बिग बींना करोनाची लागण झाली असून मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली होती. बिग बींसोबतच अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण झाली आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.