हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर’ सारख्या हिट चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री अमिषा पटेल आजकाल तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. खरं तर, ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसते. सध्या ती एका पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. Ameesha Patel
पाकिस्तान अभिनेता इम्रान अब्बाससोबत एका रोमँटिक गाण्यात अमिषा दिसली होती. त्यादरम्यानचा आमिषा अन अब्बासचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. होय आणि हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे.
अमिषाने पटेलने मात्र अफेरबाबतच्या चर्चांवर हसत हसत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमिषाने या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. “मी देखील माझ्या अफेअर बाबतच्या बातम्या वाचल्या. मला त्यावर पहिल्यांदा खूप हसू आले. कारण प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये. मला माझा एक मित्र खूप वर्षांनी भेटला आणि ती फक्त भेट होती. यादरम्यान आम्ही तो व्हिडिओ बनवला अन तो सोशल मिडियावर व्हायरल झाला. Ameesha Patel
अमीषा अलीकडेच बहरीनच्या दौऱ्यावर गेली होती, जिथे तिची एका कार्यक्रमात अब्बासशी भेट झाली. यावेळी दोघांनी ‘दिल में दर्द सा जगा है’ गाण्यावर एक मजेदार व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. हे गाणे अमिषा पटेल आणि बॉबी देओल स्टारर ‘क्रांती’ चित्रपटातील आहे. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमीषा आणि अब्बास यांच्यात अफेअर असल्याच्या अफवा सुरू झाल्या.
Discussion about this post