हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो दोन माणसांमधलं नात अधिक घट्ट करायचं असेल तर काय कराल..? अहो सोप्प आहे कि.. खमंग.. खुसखुशीत, गोड, तिखट अशा विविध चवीचे चविष्ट पदार्थ बनवा आणि समोरच्याला भरवा. मग काय.. नात्यातही येईल प्रत्येक चव. तसं जाणीव लोक सांगून गेले आहेतच कि, दिल का रस्ता पेट से जाता है! मग आजमवायला काय हरकत आहे..? म्हणूनच आम्ही सारे खवय्येचा नवा सीजन देतोय नात्यांना बहार आणि जुने स्वयंपाक करण्याची एक खास संधी.
घरातील प्रत्येकाला तृप्त आणि संतुष्ट करणारी गृहिणी रोज रोज नवीन काय बनवायचं..? या प्रश्नांसोबत रोज भांडते आणि तरीही काहीतरी चमचमीत खायला देते. म्हणूनच यावेळी सुगरणींची मदत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ करत असतो. नवे पदार्थ आणि नव्या चवी नेहमीच या कार्यक्रमाने दिल्या. पण यात काहीसा खंड पडल्यामूळे गेली २ वर्ष महिलावर्ग नाराज होत्या. पण आता नाराजीचं कारण नाही. कारण.. लवकरच तुमचा लाडका आणि आवडता कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबर २०२२ पासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. पुन्हा तुमच्या भेटीस येतो आहे. तेही एका नव्या संकल्पनेसह.
मुख्य म्हणजे यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फक्त प्रशांत दामले नाही तर त्यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडेसुद्धा करणार आहे. या पर्वाची सुरुवात कोल्हापूरपासून होणार आहे. यंदा महाराष्ट्रातील गावागावात आणि शहराशहरातील सोसायटीमध्ये ‘आम्ही सारे खवय्ये’ रंगणार आहेत. यंदाचे ‘आम्ही सारे खवय्ये’ हे पर्व ‘जोडीत गोडी’ ही संकल्पना घेऊन येत आहे. म्हणजे इथे सासू सून, आई मुलगा, नवरा बायको, जावा- जावा, वहिनी- नणंद अशा कोणत्याही जोड्या मिळून पाककृती बनवणार आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये कलाकारांच्या जोड्यादेखील सहभागी होणार आहेत. या नवीन पर्वाबद्दल संकर्षण म्हणाला कि, ‘पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे आणि उत्सुक आहे. परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे.’
Discussion about this post