हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाचे महानायक अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांच्या लग्नाचा आज ५० वा वाढदिवस आहे. सहजीवनाची हि ५० वर्ष त्यांनी एकमेकांसोबत जगली आहेत. वय वाढलं पण त्यांच्या नात्यातील बंध अगदी होते तसेच आहेत. आजही अमिताभ आणि जया यांची हि एव्हरग्रीन जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आजचा दिवस हा दोघांसाठी खास आहे आणि त्यानिमित्त अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन हे अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त होत असतात आणि याहीवेळी आजच्या खास दिवसाचे औचित्य साधून त्यांनी हि पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या ब्लॉगवर एक संक्षिप्त नोट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘३ जून उजाडतो.. आणि वर्षे ५० म्हणून मोजली जातात.. शुभेच्छांसाठी प्रेम आणि कृतज्ञता, त्या आल्या आहेत आणि कदाचित येतील..’. याशिवाय अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांनी अमिताभ आणि जया यांचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होत आहे.
श्वेता बच्चनने हि पोस्ट शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे कि, ‘५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – आता तुम्ही ‘गोल्डन’ आहात.. इतकी वर्ष टिकून राहणाऱ्या लग्नाचे रहस्य काय आहे असे विचारले असता, माझ्या आईने उत्तर दिले – प्रेम, आणि माझे वडील म्हणतात, बायको ही नेहमीच बरोबर असते’. श्वेताची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदाने या पोस्टवर रेड हार्ट ईमोजी शेअर केला आहे. आज जगभरातून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
Discussion about this post