हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चक्क ट्रोल होताना दिसले आहेत. या ट्रोलिंगचं कारण ठरलं हेल्मेट. होय. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ते विना हेल्मेट दुचाकी प्रवास करत असल्याचे दिसून आले. मग काय .. नेटकऱ्यांनी पोलिसांकडे अमिताभ बच्चन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणावरून गेले चार दिवस सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अशातच मुंबई वाहतूक पोलिस अमिताभ बच्चन यांना हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंड ठोठावणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान अमिताभ यांनी एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर बाईकवर बसलेला जो फोटो शेअर केला होता तो विनोद असल्याचे सांगितले होते. एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट घेतली असे त्यांनी या फोटोसोबत म्हटले होते. पण नंतर त्यांनी उघड केले की हा फोटो एका शुटिंगमधला होता. यानंतर आज या संपूर्ण प्रकरणाची आणखी गंमत करताना अमिताभ यांनी एक नवा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते पोलिस जीपच्या बाजूला अगदी उदास चेहऱ्यासोबत उभे असल्याचे दिसत आहे. यासह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘अॅरेस्टेड’ (अटकेत).
त्यांचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनीदेखील मजेशीर कमेंट केल्या आहेत. या फोटोवर कमेंट कात एका चाहत्याने लिहिले आहे कि, ‘डॉन….. डॉन….. डॉन……. डॉन का इंतजार तो ११ मुलको की पुलिस कर रही है! लेकीन डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकिन है!’. याशिवाय आणखी एकाने कमेंट करत म्हटलं आहे कि, ‘अखेर डॉन ला मुंबई पोलिसांनी पकडलंच’. तसेच अजून एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘तर पाहिलात तुम्ही निष्काळजीपणाचा परिणाम’. अशाप्रकारे अमिताभ यांच्या गंमतीमध्ये नेटकरीसुद्धा गंमत करत एन्जॉय करु लागले आहेत.
Discussion about this post