हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे ‘बिग बी’ महानायक अभिनेता अमिताभ बच्चन हे त्यांच्या निर्मळ स्वभावाची ओळखले जातात. एखादी गोष्ट मनाला लागली तर लगेच भावुक होणारे बिग बी सर्वांचे लाडके आहेत. अगदी कुटुंबातील सुद्धा. पण बिग बींसाठी कुटुंबातील अन्य कुणीतरी फार लाडकं आणि महत्वाचं होत. होय. होतं. कारण आता तो सदस्य हयात नाही. बच्चन कुटुंबातील एका सदस्याचं निधन झालं आहे. अमिताभ यांच्या घरातील पाळीव कुत्र्याचं निधन हि बाब अत्यंत दुःखद आहे. हे दुःख व्यक्त करताना अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
अमिताभ यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याचा आनंद आणि कुटुंबाचा भाग असलेल्या पाळीव कुत्र्याचे निधन या गोष्टीचे दुःख अशा मिश्र भावनेत बच्चन कुटुंब अडकलं आहे. त्यामुळे अमिताभ यांच्या आनंदाला विरजण लागलंय. अमिताभ यांनी आपल्या लाडक्या कुत्र्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच त्यांनी लिहिलेली पोस्ट वाचून अमिताभ प्रचंड दुःखी असल्याचे समजते आहे. सध्या त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये अमिताभ यांनी म्हटले आहे कि, ‘आमचा एक गोड छोटा मित्र.. हे येतात मोठे होतात आणि एक दिवस आपल्याला सोडून जातात’ अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे सांत्वन केले आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्येदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी लिहिले आहे कि, ‘आमच्या या छोट्या मित्राच्या अशा कायमच्या निघून जाण्याने आम्हाला खूप दुःख झालं आहे. जेव्हा तो आमच्या आसपास असायचा तेव्हा चैतन्य असायच.’
Discussion about this post