हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. याआधीदेखील त्यांना कोरोना होऊन गेला आहे. तेव्हा औषधोपचार आणि डॉक्टरांच्या मदतीने अमिताभ यांनी कोरोनावर मात केली होती. यानंतर आता पुन्हा बिग बी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या संदर्भातील माहिती स्वतः अमिताभ यांनी अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. शिवाय माझ्या संपर्कात आलेल्यांनीही कोविड चाचणी करून घ्या असे त्यांनी आवाहन केले आहे.
T 4388 – I have just tested CoViD + positive .. all those that have been in my vicinity and around me, please get yourself checked and tested also .. 🙏
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 23, 2022
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवरून सोमवारी रात्री हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘ ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनीदेखील काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी‘. रिपोर्टनुसार, सध्या अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे शूटिंग सुरू आहे. त्यातच आता अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कदाचित या शोच्या शूटवर परिणाम होऊ शकतो. पण अद्याप याबाबत निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
Oops ! Please do take good care of yourself and heal sooner 🙏
— Manoj Lahoti @ T4 (@t4travel) August 23, 2022
तूर्तास अमिताभ यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. अमिताभ यांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी आणि ते आपल्या कामावर रुजू व्हावे अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.
Get well soon sir! 💐
— Ritvik Saxena (@imritvik) August 23, 2022
माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांना जुलै २०२० मध्येदेखील कोरोना झाला होता. तेव्हा २ आठवड्याहून जास्त काळ ते खासगी रुग्णालयात भरती होते. इतकेच नव्हे तर अमिताभ यांच्या सह मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
Discussion about this post