मुंबई प्रतिनिधी | आज आषाढी एकादशीच्या निमित्त गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून पायी चालत निघालेले लाखो वैष्णवांचे भार पंढरीत दाखल झालेले आहेत. पंढरपूर शहरात सर्वत्र टाळ, मृदंगाच्या गजराने वातावरण वैष्णवमय झाले आहे. देशभरातून अनेक दिग्गज लोकांनी आणि कलाकारांनी आषाढीच्या खास शुभेच्छा सोशल मिडियावर दिल्या आहेत.
अभिनयाचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनीदेखील खास मराठीत ट्विट करून सगळ्यांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, तुमच्या परिवाराला अनेक अनेक शुभेच्छा. विठ्ठल- रखुमाईची कृपा आपण सर्वांवर सदैव राहू दे हीच प्रार्थना’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबतच काही अभंगाच्या ओळीदेखील अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून लिहिल्या आहेत.
दरम्यान पंढरपुरात आज लाखो भाविकांसह मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पहाटे सपत्नीक वडाळ्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईची विधीवत पूजा केली.
Discussion about this post