हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने उतरवला आहे. बिग बींना करोना विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांचा बंगला सील करण्यात आला होता तसंच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनचा बोर्डही लावण्यात आला होता. हा बोर्ड आता मुंबई महापालिकेने काढला आहे. ११ जुलै रोजी हा बंगला सील करण्यात आला होता. आता या बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे.
बिग बींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ११ जुलै रोजी त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच पाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांची देखील करोना चाचणी करण्यात आली. यात अभिषेकदेखील करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यालाही नानावटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करू लागले .विशेष म्हणजे या दोघांनाही लवकरच बरं वाटावं यासाठी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात अमिताभ आणि अभिषेकसाठी पूजा करण्यात आली. दरम्यान गेल्या १५ दिवसांच्या उपचारानंतर बिग बींच्या तब्येतीत सुधार होत आहे. परिणामी लवकरच त्यांना रुग्णालयात घरी सोडले जाईल अशी शक्यता आहे.